पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

शब्दांची कैफियत

शब्दांची कैफियत


जीवन असेच लढूनी संपणार शेवटी
शब्दांची कैफियत मी मांडणार शेवटी

महामारीवर मात अजून झाली कोठे ?
हे लॉकडाऊन सर्वत्र लांबणार शेवटी

तो विषाणूचा विळखा आ वासून उभा
मृत्यूचा तांडव मग थांबणार शेवटी

तो आर्त आकांत उमटला चेहऱ्यावरी
भुकेले पोट वेशीवर टांगणार शेवटी

सोमरासाशिवाय काढलेत दिस कैकांनी
ते अमृत प्राशुनी सर्व झिंगणार शेवटी

सरणावरती झाली लाकडे मोजकीच
ही गर्दी माणसातून पांगणार शेवटी

शब्दांतून असाच मी झिरपू लागलो
शब्दांचेच नक्षत्र मी मागणार शेवटी

© कमलेश सोनकुसळे, काटोल