पेज
▼
गझल पेज
▼
सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन
▼
गझल
▼
कविता मंत्र
▼
खरपुस वात्रटिका
▼
गाण्यातील माझा स्वर
▼
ग्राफिक्स
▼
अष्टाक्षरी
▼
द्रोण रचना
▼
हायकू रचना
▼
कविता १
▼
कविता २
▼
▼
चारोळी
▼
▼
प्रकाशित साहित्य
▼
सत्कार/गौरव
▼
videos
▼
हायकू खिल्लारे
▼
फ्लिपबुक
▼
मायबोली कवन
मायबोली कवन
जेव्हा 'मराठीचे' शब्द
पडती माझ्या अंतरात,
तळमळ होते काळजात
सळसळ होते देहात
शृंगारिक काव्यात
सूर्य-तारे दिवस रात्र,
विधुसंगे अवतरे
शब्दरूपी कलत्र
आतुरते श्रावणात
बरसण्यास गगन,
जाग्या होतात स्मृती
वाहतांनी पवन
बहरलेल्या बागेत
अगणित भाव-क्षण,
नाजूक फुलासंगे
फुलपाखरांचे औक्षवण
भावनेशी जुळे
संवेदनशील मन,
उदयास येती तेव्हा
मायबोली कवन
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372