पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

हुंदका

हुंदका

घ्यावा कसा आता हा श्वास जरासा
हुंदक्यात निखळे आभास जरासा

तो क्षणही कसा थांबला तुजसवे
होतो रात्रीस मज हा भास जरासा

जीवनाचे रडगाणे गायिले सदा
दुःखाच्या क्षणालाही हास जरासा

माजवले तांडव विषाणूने जगती
मृत्यूचा अजून बाकी ऱ्हास जरासा

मुखवटा घालुनी काम तो करी
होता त्यात चेहरा खास जरासा

घामावर पिकवी कोरडी शेती
सैल सोड ना रे गळफास जरासा

मलाही दे देवा जन्म तो धान्याचा
व्हावा भुकेल्या तोंडी घास जरासा

© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल ७५८८६९१३७२