पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

वादळ शब्दांचे


वादळ शब्दांचे

शब्दांच्या पलीकडे 
गावं माझे ते सुंदर
मी अजून उभा आहे
वादळात त्या खंबीर

शब्दचक्षु वेळोवेळी 
करतात मला बेजार
का कुणास ठाऊक आता
शब्दच माझे होणार

भावनेच्या लपंडावामध्ये 
अलगद झाला उशीर
शब्दांचे पारणे फेडण्यास
शब्दानेच माजवले काहूर

ऐकून ते शब्द तुझे 
पुन्हा वादळ उठणार
अंतरीच्या कोपऱ्यातले
माझेच शब्द जाळणार

शब्दांच्या त्या चढाओढीत 
कानही झाले आतुर
शब्दांची वाट चुकविन्या
आता शब्दच झाले फितूर

कमलेश तुकाराम सोनकुसळे 
काटोल, नागपूर  7588691372