पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

स्मरण

स्मरण

दोन शब्दांसाठी तुजसवे जुळलो बहुदा
आठवांच्या स्मृतिसवे मग जळलो बहुदा

सुखाने मजसाठी दार ठोठावलेच नाही
अर्धा जुगार मोडीला अन् हरलो बहुदा

डुंबत गेलो नकळत दुःखाच्या सागरात
सुखासवे किनारी शेवटी तरलो बहुदा

दोन घास पिलांसाठी इमानदारीने भरविले
वैऱ्यांसाठी बेईमान मग ठरलो बहुदा

खंगलेल्या हाडांनी नाते त्यांचे सांधत गेलो
फाटत गेलो अन् किनारी उरलो बहुदा

कुठे टेकावा माथा अन् कुठे घ्यावा विसावा ?
सरण पेटले अन् राखेतून स्मरलो बहुदा

© कमलेश सोनकुसळे