पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

रानफुल होऊन मी


*रानफुल होऊन मी....*















कळी उमलून जेव्हा मी
नाळेतून श्वास घेते,
जगता यावे मलाही स्वैर
म्हणून थोडं झटून पाहते

फुलणाऱ्या फुलासंगे

पाहरा काट्यांचा असते,
न लागावी दृष्ट तुला
म्हणून थोडं जपून पाहते

सभोवताल प्रभातकाळी

गंध फुलांचा दरवळते,
हृदयी असशी फक्त तू
म्हणून थोडं जगून पाहते

रानफुल होऊन मी

वाऱ्यासंगे गिरकी घेते,
'अस्तित्व' हे जीवन व्हावे
म्हणून थोडं झगडून पाहते

©*कमलेश सोनकुसळे*

*काटोल, नागपूर*