पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

वेदना

वेदना

नजरेसमोर आल्यावर
हृदय माझं हेलकावलं
अलगदच अश्रूने मग
पापण्याचं दार ठोठावलं

तुझ्या हास्यचंद्रावर मात्र
दुराव्याचं वादळ उमटलं
भूतकाळात जाऊन क्षणार्धात
आठवणींचं गाव पेटवलं

रक्ताचं नसून सुद्धा
प्रेमाचं नातं जुळलं
विरह सोसण्यास मन
वेदनेने व्याकुळ झालं

नकळत तुझ्या डोळ्यांत
पावसाचं सावट दाटलं
नजरेआड जाताना तू
हृदय माझं रडू लागलं

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372