पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

विरह मनातला

 विरह मनातला

मनात असून सुद्धा
नाही नाही म्हणायला
असं कसं जमतंय तुला
दूर दूर रहायला

जमतंय कसं नेहमी तुला
भावविश्वात जगायला...
मन मात्र माझ्या स्वप्नात
हळुवार पाठवायला...
मी कुठे नाही बोललो
नाक तुला मुरडायला...
असं कसं जमतंय तुला
दूर दूर रहायला

नसतेस ना तू सखे
समोर मला बघायला...
मन तेव्हा लागतंय
तुझ्याकडे धावायला...
ये ना एकदा तरी गडे
दुनियादारी शिकायला...
असं कसं जमतंय तुला
दूर दूर रहायला

तुझ्यात जीव ओतला
शब्दात शब्द गुंफायला...
शब्दच झाले वैरी बघ
प्रेमाची थाप मारायला...
तुझ्या आठवणीत मज
नको लावू झुरायला...
असं कसं जमतंय तुला
दूर दूर रहायला

आता तरी येना प्रिये
मन माझं सावरायला...
तुझ्या विरहात माझं
दुरचं गाव शोधायला...
पापण्यांच्या आडचा
मोती जरा बघायला...
असं कसं जमतंय तुला
दूर दूर रहायला

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२