पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

तुला टाळतो मी.


तुला टाळतो मी


तुझा स्पर्श होता किती भाळतो मी

तुझा भास आता  सखे टाळतो मी


तसा छंद नाही   मला पुस्तकांचा

जुने घाव माझे   सदा चाळतो मी


कसे  दुःख  सांगू   इथे संचिताचे

सुखाचेच अश्रू   सखे गाळतो मी


किती गंध होता   बरे केवड्याला

अता मोगरा रे    सदा माळतो मी


नसे  काम माझे   जरी  शेतकीचे

तरी घाम माझा   इथे जाळतो मी


(जरी गझल माझी नसे ती रुबाई)

(तरी रे अलामत   बरे पाळतो मी)



गझल : भुजंगप्रयात

गण: लगागा लगागा लगागा लगागा

© कमलेश सोनकुसळे