मतांसाठी गुंतागुंत
गोळा बेरीज चालली
हाती हिरवी नोट देऊन
टिप्पारणी उडविली
पेरून आडवं तास
फवारणी चालली
पावसाने दडी मारून
टिप्पारणी उडविली
मालासाठी भवनावर
रॅली पुढे पुढे चालली
हमीभाव देतो म्हणून
टिप्पारणी उडविली
शेतकऱ्यांसाठी पॅकेज
कर्ज माफी चालली
एक रुपया माफ करून
टिप्पारणी उडविली
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर
www.kavya1029.blogspot.com