पेज

गझल पेज

सौ सुधा जाधव यांचे काव्यलेखन मार्गदर्शन

गझल

कविता मंत्र

खरपुस वात्रटिका

गाण्यातील माझा स्वर

ग्राफिक्स

अष्टाक्षरी

द्रोण रचना

हायकू रचना

कविता १

कविता २

चारोळी

प्रकाशित साहित्य

सत्कार/गौरव

videos

हायकू खिल्लारे

फ्लिपबुक

बंध प्रेमाचे

बंध प्रेमाचे

निःशब्द आसमंत
माझ्यावर रुसले
तिन्ही सांजकाळी
मिठीत जाऊन बसले

अबोल अधरांशी
नाते असे जडले
तुझ्यासवे अश्रूही
हृदयी जाऊन वसले

सहज वळती मन
हे नाते तरी कसले ?
वचन देता तुजला
मनही माझे खचले

नकळत मनी माझ्या
प्रेमाचे बंध साचले
हृदय झाले घायाळ
फुलेही मनी रुतले

एकांतातील भेटीचे
श्वास हळूच दाटले
दूर जाताना सख्या रे
नयनांचे बांध फुटले

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372