गगनभरारी
अपयश आले जरी
संकल्प जिवंत उरी
चंद्राला गाठण्यास
घेऊ गगन भरारी
आता नाही माघार
चढू यशाची पायरी
मनी उमंग भरुनी
घेऊ गगन भरारी
यशाला स्पर्शण्यास
भेदू अपयशाची पायरी
चंद्रावर पाऊल ठेवण्या
घेऊ गगन भरारी
अथांग अंतराळात
भारताची रे स्वारी
चंद्राच्या पलीकडे
घेऊ गगन भरारी
इसरोची किमया
बघेल दुनिया सारी
जगाच्या पलीकडे
घेऊ गगन भरारी
© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
-
[24/04, 9:12 am] Shankar Ghorse: *उपक्रमातील आजचे आतिथी कवी आहेत कमलेश सोनकुसळे, काटोल.* [24/04, 9:14 am] Shankar Ghorse: *त्याचा परिचय ख...
-
बंदीस्त नाती पिकले पान ते, वाळले कधीचे नियम जगाचे, पाळले कधीचे सुगंध नात्यांचा, मनी दरवळे गजऱ्यात फुले, माळले कधीचे नियतीने केली, थट...
-
अंतरीचे तरंग आनंद घेऊन आला, धुडवळीचा रंग राधा सवे कान्हा, वाहे अंतरीचे तरंग मनातून भेद काही, मिटता मिटेना जगण्याचा होता तो, वेगळाच ढंग...
-
दूर तुझ्यापासून इथे मी जरी काळीज झोकिले फक्त तुझ्यावरी कधी असते अंतरी कधी अधांतरी आणि कधी असते माझ्या जवळी विरहाने घेतल...