निकाल
मॅच संपली असली तरी
निकाल अजून बाकी आहे
कोणाची पडणार विकेट
कोण ठरणार लकी आहे
निकालाची धडधड सुरु
रात्र अजून बाकी आहे
स्ट्रॉंग झोनच्या परिसरात
लक्ष ठेऊन खाकी आहे
कोण पुढे अन् कोण मागे
शर्यत अजून बाकी आहे
निकाला अगोदर कोणाची
तयार झाली झाकी आहे ?
थर्ड अंपायरचा निकाल
यायचा अजून बाकी आहे
येऊन येऊन कोण येणार
जिंकणार लोकशाही आहे
© कमलेश तुकाराम सोनकुसळे
-
[24/04, 9:12 am] Shankar Ghorse: *उपक्रमातील आजचे आतिथी कवी आहेत कमलेश सोनकुसळे, काटोल.* [24/04, 9:14 am] Shankar Ghorse: *त्याचा परिचय ख...
-
बंदीस्त नाती पिकले पान ते, वाळले कधीचे नियम जगाचे, पाळले कधीचे सुगंध नात्यांचा, मनी दरवळे गजऱ्यात फुले, माळले कधीचे नियतीने केली, थट...
-
अंतरीचे तरंग आनंद घेऊन आला, धुडवळीचा रंग राधा सवे कान्हा, वाहे अंतरीचे तरंग मनातून भेद काही, मिटता मिटेना जगण्याचा होता तो, वेगळाच ढंग...
-
एक होती चिऊ... सगळे मिळून गाणे गाऊ || एक होता काऊ... आपण सारे खेळायला जाऊ || एक होती कोकिळा... तिचा होता मधुर गळा || ए...
