गेले बालपण हसत खिदळत,
स्वप्न आता तू सासरचे पहा,
माहेरच्यांची तुला चिंता नको,
मुली, दिल्या घरी तू सुखी रहा.
दिले तुला नवख्या घरी,
हो त्या घरची तू पार्थ,
सासरच्या नात्याला जपुनी,
सोड स्वतः माहेरच्यांचा स्वार्थ.
नाते फार महत्वाचे संसारी,
सासू सासरे दीर नणंद जाऊ,
तुझ्या लाडक्यांना भरवतील घास,
अवतरेल दारी चिऊ अन काऊ.
आई होण्याचे सुखद स्वप्न,
तुलाही जीवनात लाभू दे,
जडणघडणीचे अतूट संस्कार,
तुझ्या मुलांबाळांवर होऊ दे.
चार भिंती सुखी संसारी,
घराचे घरपण राखुनी दारी,
प्रगतीचे ठेऊनी भाव अंतरी,
पिल्लांची बघ तू उंच भरारी.
चालव सुखी संसाराचा गाडा,
होऊन दोन घराण्यातील दुवा,
संस्काराचा मंत्र प्रत्येका देऊन,
सदा वाटावा सकलांना हेवा.
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372