वणवा
पडली ठिणगी पेटला वणवा
कळले न मला इशारा केला
व्यक्त तुझ्यात व्हायचं राहिलो
मनानं मनाचा कोंडमारा केला
शब्दांच्या वणव्यात पेटलो असा
हृदयाला पेटवून निखारा केला
दुःखाचा डोंगर पार होता होईना
सुखाच्या जीवनाचा घसारा केला
कधी ना भेटती दोन किनारे इथे
वाहत्या पाण्याला सहारा केला
शब्दही पेटले वणव्यात आता
काळजाचा इथे पसारा केला
© कमलेश सोनकुसळे