"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

आवेग कवितेचे रसग्रहण

[24/04, 9:12 am] Shankar Ghorse: *उपक्रमातील आजचे आतिथी कवी आहेत कमलेश सोनकुसळे, काटोल.*


[24/04, 9:14 am] Shankar Ghorse: *त्याचा परिचय खालीलप्रमाणे....*
[24/04, 9:14 am] Shankar Ghorse: *परिचय*

*************************
कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, जि. नागपूर
*************************


*********************
*काव्यात्मक प्रवास*
*********************
♦️ प्रकाशित काव्यसंग्रह *शब्द अंतरीचे*

♦️ नेवासा, अहमदनगर येथे राज्यस्तरीय कविसंमेलनात *कुसुमाग्रज* पुरस्कार प्राप्त

♦️ प्रातिनिधिक काव्यसंग्रह, वर्तमानपत्रे, मासिक व नियतकालिकातून कविता व लेख प्रसिद्ध

♦️ ऑनलाईन कविता ब्लॉग
https://kavya1029.blogspot.com


*********************
*शैक्षणिक क्षेत्र प्रवास*
*********************
*होऊ या प्रज्ञावंत*
https://etest1029.blogspot.com
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन टेस्टचे आयोजन
*********************
शैक्षणिक ब्लॉग
http://kamlesh1029.blogspot.com/?m=1

♦️शैक्षणिक क्षेत्रात तालुका ते राज्य
एकूण 15 पुरस्कार प्राप्त
*********************

*आवड : कविता, चारोळी, वात्रटिका लेखन, रांगोळी,  ग्राफिक्स*

🙏🙏🙏🙏🙏
कमलेश सोनकुसळे, काटोल
7588691372
*********************


[24/04, 9:23 am] कमलेश सोनकुसळे: सर्व सन्माननीय रसिकजणांचे मनस्वी स्वागत
💐💐💐💐
*************************


[24/04, 9:53 am] Shankar Ghorse: *आजची कवीता*


[24/04, 9:53 am] Shankar Ghorse: आवेग

टवाळखोरांना सदा दिवाळी
करावी नुसती टवाळी,
फाडावी कधीही चोळी
चुकवावी तिची पाळी....
यांच्या डोळ्यातली बाहुली
वळवळतेच कशी ?
अशा हरामखोरांना
जगण्याची संधी
मिळतेच तरी कशी ?
चारदा तर त्यांनीच
चुकवली स्वतःची पाळी,
काळ्या दगडावरची
रेघ होती काळी,
फक्त लाकडे तेवढे
जमा करायचे होते बाकी,
त्यांच्या शरीराची तर
पेटणारच होती होळी.....
सात वर्षानंतर
आला तो क्षण
वाजविण्यास टाळी,
पुन्हा एकदा
फाशी चुकवण्यास,
याचना केली त्यांनी
गाळले आसवे
लोळले जमिनीवरती,
कदाचित त्यांना
आठवत असेल 'ती'
त्यांना लटकवल्यावर
शमला जरा आवेग
आणि देशासकट
मायच्या चेहऱ्यावर
उमटली झळाळी.....
शेवटची विनंती देवा तुला
टाकलाच प्राण पुन्हा तिच्यात,
तर चालेल तिच्या डोक्यावर मोळी,
पण असले जीवन लिहू नको
निर्भयाच्या भाळी

© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
*************************



[24/04, 10:30 am] +91 84128 77220: © कवी  कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२ यांच्या आवेग या कवितेचे रसग्रहण

आजच्या मृद्गंध समूहाच्या उपक्रमात सहभागी कवी कमलेश सरांचे मनःपूर्वक अभिनंदन... देशापुढे आ वासून उभ्या असलेल्या ज्वलंत समस्ये पैकी एक समस्या म्हणजे हल्ली देशात वाढत चाललेले नारी अत्याचार प्रकरणे. गेल्या सात वर्षांपूर्वी दिल्लीत धावत्या बस मध्ये निर्भायावर झालेल्या अत्याचारावर आधारित ही कविता असली तरी ती प्रातिनिधिक आहे. अशी अनेक प्रकरणे कानून कायदे तुडवून देशात सर्रास  घडली जातात.कायद्याच्या पळवाटा त्यांच्या सहाय्यक ठरतात. बलात्कारानंतर गुन्हा कबुल झाला असेल तर अशांना तत्काळ मृत्यू दंड द्यायला हवा. एखाद्या पीडितेला अनेक वर्षानंतर मिळालेला न्याय हा न्याय ठरत नाही. हीच गोष्ट निर्भयाला लागू पडते. अमानुष अत्याचार करणाऱ्या त्या चार गुंडांनी कधी नाबालिग असल्याचा फायदा घेतला, तर कधी वकिलांचा आसरा, राष्ट्रपती दया असे करत करत त्यांनी तब्बल सात वर्षे चुकवले. निर्भयाच्या आईचा आणि देशातील तमाम नागरिकांचा संताप वाढत असताना त्यांना गेल्या महिन्यात फासावर लटकवले गेले.
प्रस्तुत कवितेत कवी कमलेश यांनी हा प्रकार शब्द बिंबित करून आपला संताप व्यक्त करून देशातील अशा अनेक निर्भयांसाठी सुरक्षितता आणि न्यायची मागणी केली, ही कवीच्या संवेदनशील मनाची ग्वाही आहे.

लीलाधर दवंडे
८४१२८७७२२०
*************************



[24/04, 11:43 am] Gomase Sir Vasant: आवेग

आवेग प्रत्येकाच्या लेखनीतून उतरत नाही.
त्या आवेगालाही
हवी असते
एक उद्वेगाची किनार,
एक चिंतनशील मन,
नुसता शब्दांचा शिडकावा
नको असतो त्याला.
विकार उद्ध्वस्त करण्याचे
कसबही हवे असते त्यात
मुळावरच घाव घालण्याचे
बळही द्यावे लागते त्याला
हेच केलेय कमलेशने
आवेगातून
उद्वेगातून......


      कमलेश, शुभेच्छा...
   एक सुंदर रचना...

      —वसंत गोमासे, नागपूर
*************************



[24/04, 1:05 pm] +91 99229 37339: आवेग
=====
कवी कमलेश सोनकुसळे यांची
"आवेग" ही कविता अतिशय ज्वलंत शब्दात आजचे समाज
वास्तव मांडते आहे. आजही
स्त्रियांवर अमाणूष अत्याचार
होतात.ही विकृती आहे. नव्हे
समाजाला .लागलेली कीड आहे.
कितीतरी निर्भया आजपर्यंत बळी
गेलेल्या आहेत.
निर्भयाला सातवर्षांनंतर न्याय
मिळाला. चौघानांही फाशी देण्यात आले.त्याअगोदर त्यांनी
स्वत:चा जीव वाचविण्यासाठी
कितिदातरी प्रयत्न केले. पण
ते निष्फळ ठरलेत.अशा
टवाळखोरांचे कवीने अतिशय
प्रखर शब्दात वर्णन केलेले आहे.
"टवाळखोरांना सदा दिवाळी
करावी नुसती  टवाळी
फाडावी कधीही चोळी
चुकवावी तिची पाळी"
अशा हरामखोरांना जगण्याची संधी तरी कशी मिळते हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.
चौघांनाही फाशी दिल्यानंतर
शमला शमला जरा आवेग आणी
देशासकट मायच्या चेहऱ्यावर
उमटली झळाळी.हे खरे वास्तव
कवीने कवितेच्या माध्यमातून
शब्द बध्द केलेले आहे. कविता
आवडली.कवीला हार्दिक शुभेच्छा.
■शांताराम हिवराळे
पिंपरी, पुणे
9922937339
*************************



[24/04, 3:04 pm] +91 81779 77390: सोनकुसळे सर,
पीडीतांच्या अन्यायाला वाचा फोडणारी रचना आहे ही !
ही टवाळी नाही तर नराधमांची रसातळी जाण्याची खेळी आहे. होणाऱ्या परिणामांची जाणीव होत नसेल का ? आज नाही तर उद्या आपल्याला नरकात जायचंय...याचं भान नसेल का?  शारिरीक भूक भागविण्यासाठी इतका पाशवीपणा ! आपल्याकडे पुरूषप्रधान समाज आहे.नैतिकतेच्या मार्गाने चालणारी न्यायव्यवस्था शिक्षा द्यायला विलंब करते.ती तडफताना बघताना ह्यांना लाज कशी वाटली नाही !तडफडताना जगण्याची याचना करत असेल.  आई म्हणून किंचाळली असेल...थोडंही ह्रदय द्रवत नाही का या हराम खोरांचं....!!निष्पाप निर्भयांचा जगण्याचा हक्क ज्यांनी हिरावून घेतला त्यांना त्वरीत फाशी द्यायला हवी तरच अशा पाशवी गुन्हेगारांना आळा बसेल.
आपली कविता म्हणजे निष्पाप निर्भयांना वाहिलेली श्रद्धांजली !
आपल्या लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा !
      सौ. मंगल लेंडे
           बोटा
*************************



[24/04, 3:16 pm] +91 87936 84054: 🙏कमलेश सोनकुसळे.
आपली आजची कविता जणु मशाल
घेऊनी हाती लेखणी आवेग चालली
असे म्हणावेसे वाटते.. आपण आजच्या अगदी रोजच जी कृत्य वाचतो त्या समस्या बाबत मांडली
आहे अतिशय चीड आपणास आली आहे. खुप सुंदर ओळी यांच्या डोळयातील.... जगण्याची संधी 👌
सात वर्षे लागले एका आईला न्याय
मिळायला हे सुद्धा प्रकर्षाने जाणवते.
खुप सुंदर काव्य. आणि खरंय जो पर्यंत अशांना शिक्षा होत नाही तो
पर्यंत हे प्रश्न सुटणार नाही..
सुंदर शब्दाने भाव रंग वले आहे.
असो पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
धन्यवाद...
स्मिता किडिले..
*************************



[24/04, 3:30 pm] +91 95275 67711: आदरणीय कमलेश सोनकुसळे यांची आवेग कविता म्हणजे अंतर्मनातील धगधगती ज्वाला लेखणी रूपाने अवतरली आहे .फासावर लटकावलेल्या नराधमांना सजा सुनावत आहे. निर्भयाच्या आर्त किंकाळी ला दिलेला हा मोठा प्रतिसाद आहे .तिच्या आईच्या अंतर्मनाला लावण्यासाठी आपली कविता एक मलम आहे. संवेदनशील समाजमनाचं चित्र आपल्या कवितेत रेखाटला आहे.
 आपल्या लेखणीस मनापासून शुभेच्छा
कवी इंद्रकुमार झांजे
कडा आष्टी जि बीड
*************************



[24/04, 3:33 pm] +91 99703 41646: कवी कमलेश सोन कुसळे यांची आवेग ही कविता समाजातील स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची कहानी सांगतानाच स्त्रियांच्या डोक्यावर एक वर लाकडाची मोळी आली तरी चालेल पण तिच्या भाळी दिल्लीतील निर्भया ने  सोसलेले अनन्वित अत्याचार लिहू नकोस अशी कळकळीची विनवणी परमेश्वराकडे करते.

सध्याचा काळ स्त्रियांच्या दृष्टीने अतिशय कठीण आहे पहावे तिकडे नराधमांची टोळी नाक्या-नाक्यावर टपून थांबलेली आहे. एखादी लहान मुलगी, एखादी तरुणी, एखादी प्रौढा, इतकेच काय वृद्धा जरी त्यांच्या दृष्टीस पडली तरी ते लांडग्यासारखे तिच्यावर तुटून पडत आहेत. तिच्या रक्षणासाठी समाजातील इतर घटक जणूकाही कुचकामी ठरलेले आहेत. निर्भयावर एका बसमध्ये पाशवी अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. पोलिसांनी चार नराधमांना पकडले. त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला. त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. पण निगरगट्ट झालेल्या राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. त्याच्या फाशीची अंमलबजावणी तीन वेळा पुढे ढकलली गेली.साऱ्या देशांमध्ये त्यांना फाशी देणे विषयी आक्रोश होत असताना कायद्यातील पळवाटांचा आधार घेत हे या नराधमांनी सात वर्ष त्यांची शिक्षा पुढे ढकलली होती. एखाद्या व्यक्तीला उशिरा न्याय देणे म्हणजे त्याला न्याय नाकारणे असाच अर्थ असतो. सर्वशक्तीमान कायदा देखील स्त्रियांच्या बाजूने उभा राहून त्यांना न्याय देऊ शकत नाही असे वाटले म्हणूनच कवीने म्हटले आहे.

शेवटची विनंती देवा तुला
टाकलाच प्राण पुन्हा तिच्यात
तर चालेल तिच्या डोक्यावर मोळी
पण असले जीवन लिहू नको
निर्भयाच्या भारी..


अतिशय प्रभावी शब्द रचना वापरून आणि मनातला संताप शब्द शब्दांमध्ये भरून कवी कमलेश सोनकुसरे यांनी एका ज्वलंत विषयाला वाचा फोडली याबद्दल त्यांचे मनस्वी अभिनंदन... त्यांच्या पुढील काव्य प्रवासास मनोमन शुभेच्छा.


प्रा. जयसिंग गाडेकर
आळे जुन्नर पुणे
24 एप्रिल 20 20
*************************



[24/04, 3:48 pm] +91 98226 41582: कमलेश सोनकुसळे काटोल यांच्या आवेग कवितेचे रसग्रहण...
विक्रुत मनोव्रुत्तीच्या टवाळखोरां बद्दल परखड विचार या कवितेत कवींनी मांडले आहेत.तसल्या हरामखोरांना जगण्याचा अधिकार नाही. सात वर्षापूर्वीची ही निर्भया बळी गेलेली घटना आहे. आरोपींना वाचविण्यासाठी वकील मिळाले. पण वकिली डावपेच नराधमांना वाचविण्यास कामी पडले नाहीत. अशा दुर्दैवी घटना मन हेलावतात पण घडतच ऱाहतात. कवी म्हणतात , देवा, असले जीवन लिहू नको निर्भयाच्या भाळी. कविता वाचताना आपले मन सुन्न हेऊन ती घटनाच डोळ्यापुढे येते. कवींना कवीमनाच्या परखड शैलीबद्दल शुभेच्छा.
नागपूर
२४/४/२०२०
डॉ विनोद अलोणी
९८२२६४१५८२
*************************



[24/04, 5:12 pm] +91 94230 49403: आवेशपूर्ण कविता खूपच प्रभावशाली व अर्थपूर्ण

रश्मी देवगडे नागपूर
*************************



[24/04, 5:32 pm] +91 83085 58995: कमलेश सोनकुसळे यांची आवेग ही कविता निर्भयावरील अत्याचार आणि खूनप्रकरणी भावना व्यक्त करणारी
आहे. या नीच अत्याचा-यांवर त्यांनी चांगले आसूड ओढले आहेत. आणि त्या हरामखोरांनी स्वत:च्या नीच कृत्यांनी  स्वत:ची चिता स्वत:च रचली.नंतर किती रडले,भेटले ,सात वर्ष न्यायाची फरफट चालू होती.अखेरीस सर्वांना फासावर चढवल्यावर आईनं समाधानानं श्र्वास घेतला.
       कवी म्हणतोय पून्हा निर्भयाला पुनर्जन्म मिळाला तर गरिबी दिलीस तर चालेल देवा,असलं भिषण जीणं नको देऊ तिच्या वाट्याला.
         खूप आर्ततेनं कविता लिहिली आहे. कविता छानच आहे.हार्दिक अभिनंदन आणि साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन थांबते.

सुनिता सुरेश महाबळ
बालेवाडी,पुणे
8308558995
*************************



[24/04, 5:45 pm] +91 90211 12930: ## आवेग ##
कवी कमलेशजी यांची "आवेग "ही कविता आतिशय ज्वलंत विषय घेऊन
समाज वास्तव मांडतांना दिसते. आजही स्रियांवर अमानुष अत्याचार होतात. ही विक्रृती आहे. समाजाला लागलेली कीड आहे. आता पयँत किती तरी निभँया चा बळी गेला आहे.
या प्रकरणाला 7वषाँनी न्याय मिळाला असून त्यात चौघांना फाशी देण्यात आली.
स्वताचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी खुपच प्रयत्न केले पण ते निव्वळ फेल गेले या साठी कवीने प्रखर अशा शब्दात वणँन केले..
""हराम खोरांना जगण्याची संधी
मिळते च कशी """
चौघांना फाशी दिल्यानंतर तिच्या आईच्या चेहर्‍यावर झळाळी ऊमटली!!
कवीने कवितेच्या माध्यमातून खरे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कवीता चांगली आहे. 🙏🙏🌷
कवीला शुभेच्छा..!
🖋प्रकाश पाटील जळगाव (खान्देश)
  9021112930
*************************



[24/04, 6:38 pm] +91 73878 91486: कवी कमलेश सोनकुसळे यांची आवेग ही कविता स्त्री अत्याचाराविषयी देशातील आजच्या परिस्थितीचे जीवंत वास्तव नजरेसमोर ठेवते. स्त्रियांसाठी सुरक्षितता आणि न्यायाची मागणी कवी या कवितेतून करतो आहे.

              डाॅ.निता मेश्राम पाटील नागपूर
*************************



[24/04, 6:41 pm] +91 90286 93591: मा. कवी कमलेश सोनकुसळे म्हणजेच सरस्वती च एक लेकरु... माता शारदेने चौसष्ट कला त्यांच्या वरच उधळल्या... नाविन्यपूर्ण पुर्ण रंगरंगोटी ने नटलेल्या रांगोळ्या च काय अनेक चित्रे  त्यांनी रेखाटली... असे हे चित्रकार हळव्या मनाचे तसेच स्पष्टपणे वक्तव्य करणारे कवी आहेत , , हे त्यांची ' आवेग' ही कविता  वाचून लक्षात येते..

 सात वर्षापूर्वी निर्भया वर अत्याचार झाल्या नंतर तिने न्याय मिळायला वेळ लागला... पण शेवटी निकाल तिच्या बाजूने लागलेला असला तरीही कवी मनात त्या टवाळ खोरांविषयी संतापाची लाट उसळली आहे....
 टवाळ खोरांना काय दररोज दिवाळी असते... ते वाट पाहत असतात कुणावर अत्याचार करायचा कुणाची फाडायची चोळी...  चुकवावी तिची पाळी... बापरे! किती विषिण्ण  मन ... कसे काही का नाही वाटत ...  मुलगी लहान असो अथवा मोठी हे हरामखोर .. दिवाळी साजरी करायची... त्याचा त्रास होणार त्या बिचारी ला .. चुकली पाळी , राहिली गरोदर  परत समाज त्रास कुणाला देणार तर तिला.... ..
 अशा ंना जगण्याचा अधिकार का द्यायचा... केवळ एकदा नव्हे तर चार चार वेळा... कधी नाबालीक म्हणून तर कधी अन्य सबबी सांगून... त्या हरामखोर अत्याचारी ला तिच्या वर अत्याचार करतांना त्याचे वय लहान आहे हे नाही समजले.. मग शिक्षा देताना कोर्टाने का तरी वयाची मर्यादा लक्षात घ्यायची.... त्यांना शिक्षा द्यायला विलंब का करावा..

कवितेचा करतांना कवी अधिक भावनाप्रधान होतात, ते लिहितात..
शेवटची विनंती देवा तुला
टाकलाच प्राण पुन्हा तिच्याण
तर चालेल तिच्या डोक्यावर मोळी
पण असले जीवन लिहू नको निर्भयाच्या भाळी

   खरंय एवढ्या शोकाकुल करणाऱ्या घटना  हेच मागणे मागेल परत निर्भया जन्माला आली तर तिला मेहनत , कष्ट सोसावे लागले तरी चालतील पण परत कोणतीही निर्भया अशा हरामखोरांचा घास कधी होऊ नये..

 मा. कमलेश सर आपल्या लेखणीला भरभरून शुभेच्छा

माला पारीसे
नागपूर
८२७५७९४०४८
९०२८६९३५८९१
*************************



[24/04, 7:04 pm] +91 90960 54779: कवी कमलेश सोनकुसळे यांची ''आवेग'' ही कविता वाचली. कवीने आपल्या कवितेत टवाळखोर लोकांना आपल्या असुरी आनंदाकरिता दुसऱ्यांना दुःख देण्याची हिम्मत कशी होते हा प्रश्न कवीला पडला आहे.
अश्या या नराधमांच्या कृत्याबद्दल कवी चीड व्यक्त करतो की अश्या हरामखोरांना जगण्याचा कोणताच हक्क नाही.
आतातरी न्याय व्यवस्थेला जागे होण्याची गरज आहे. अश्या कृत्य करणाऱ्या नराधमाला शिक्षा देण्यास विलंब लावू नये.
आपल्या कवितेत  कवीने ज्वलंत विषयाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. असल्या मानसिकतेचे लोकं
समाजाला लागलेली कीड आहे.
शेवटी कवी परमेश्वराला विनंती करतो की, दिलाच जर पुन्हा जन्म तर तिला कितीही मेहनत घ्यावी लागली तरी चालेल पण असले जीवन तिच्या नशिबी लिहू नको.
या सर्वांमधून कवींनी समाजालाही जागे होण्याचा मंत्र दिला आहे.
अश्या प्रकारे आपल्या मनातील चीड कवींनी आपल्या कवितेतून व्यक्त केली आहे.
विनोद धनराज देशमुख
नागपूर
9096054779
*************************



[24/04, 7:10 pm] +91 73505 22178: आवेग ही कमलेशजींची निर्भयाबद्दलची एक निर्भिड रचना.अतिशय स्पष्टपणे कवितेतून कमालीचा उद्रेक उसळलेला दिसतो.
कवितेची सुरूवातच इतकी प्रभावी आहे की वाचताच क्षणी समाजातील नराधम प्रवृत्तीची चिड यावी. संस्कारहिन तरूणांची शिकार निरपराध निर्भया होते आहे.म्हणून कवी परखडपणे म्हणतात,
"टवाळखोरांना सदा दिवाळी
करावी नुसती टवाळी,
फाडावी कधीही चोळी
चुकवावी तिची पाळी...."

या ओळी वाचल्या की मन सुन्न होऊन जातं.मग अनेक प्रश्न पडत जातात.सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे असे नराधम गुन्हा करून मोकाट फिरतातच कसे? यांची नजर पुन्हा दुसरी शिकार शोधण्याची हिंमत करतेच कशी?
"यांच्या डोळ्यातली बाहुली
वळवळतेच कशी ?
अशा हरामखोरांना
जगण्याची संधी
मिळतेच तरी कशी ?"

जिथं 'सतराव्या' वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल जर 'सत्तराव्या' वर्षी लागत असेल तर न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा कसा हा प्रश्न सामान्य माणसाला पडतोच.दिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या निकालाचीही सात वर्षे वाट पहायला लागते हे दुर्दैव!

"सात वर्षानंतर
आला तो क्षण
वाजविण्यास टाळी,
......
त्यांना लटकवल्यावर
शमला जरा आवेग
आणि देशासकट
मायच्या चेहऱ्यावर
उमटली झळाळी....."

शिक्षा झाली म्हणजे आपली जबाबादारी संपली असं नाही.कायद्यात व समाजाच्या मानसिकतेत बदल घडण्याची गरज आहे. समाजमाध्यमांचा व प्रसारमाध्यमांच्या अतिरेकी ,अविवेकी वापरामुळे,वाचनसंस्कृतीकडे आजच्या बहुतांशी तरूणांनी पाठ फिरवल्यामुळे,चंगळवादाच्या आहारी गेल्यामुळे विवेक नाहीसा होतो आहे.अशा वेळी माणसाच्या जडणघडणीत साहित्य हा एकमेव आधार वाटतो.मनपरिवर्तन करण्याची क्षमता नक्की साहित्यामध्ये आहे.गरज आहे ती आजच्या पिढीला वाचनाकडे वळवण्याची.जेव्हा "आवेग" सारखी दर्जेदार निर्मिती होते तेव्हा कुठेतरी आशा निर्माण होते की समाजात पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत. एक विचारात पाडणारी रचना वाचनात आली.
कवीचे अभिनंदन!
संयोजकांचे आभार!!

डाॅ.गणेश सोनवणे
*************************



[24/04, 8:00 pm] +91 86989 92622: अंतर्मुख करणारी रचना 🙏🏼🙏🏼
*************************



[24/04, 8:36 pm] +91 93253 70576: कमलेश जी सोंकुसळे आपली कविता म्हणजे निर्भया चे भेदक चित्रण करून अपप्रवूवित्ती वर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. . आजच्या टवाळखो रावर  हल्ला करून कवितेचा विषय स्पष्ट केला आहे.  शेवटचे कडवे तर अत्यंत भावूक आहे. कोणत्याच स्त्रीवर अशी वेळ येवू नये . बलात्कार ,एसिड ,शोषण ,खून , लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार या सर्व घटनांनी संपूर्ण देशाची  झोप उडविली आहे . यापुढे आपल्या देशात स्त्री सुरक्षित राहील का ?
आपल्या देशात स्त्रीवर होणाऱ्या लैंगिक शोषण नामुळे कित्येक महिला मृत्युमुखी पडलेल्या आहे.  प्रत्येकाच्या मनातील होणारी तगमग कवीने आपल्या कवितेतून व्यक्त केली आहे. खुप खुप शुभेच्छा आणि असेच लीहते व्हा

सुनिल वाडे💐💐💐🙏
*************************



[24/04, 8:58 pm] +91 98608 83610: पाहुणे बघायला आल्यावर गरीब बापाची लेक नटून थटून येते. सुखी संसाराचे स्वप्न बघत पाहुण्यांना चहापाणी देते. पाटावर बसते. नजरानजर होताच ती पाहुण्यांना पसंत पडते. पण लग्नाच्या बोला चालीत हुंड्याचे नाव निघताच ती स्वतःची जीवनयात्रा संपवते. तेंव्हा त्या गरीब बापाची कशी घालमेल होते ते या कवितेतून कवीने कळकळीने व्यक्त केले आहे. त्यांच्या या कवितेस सलाम !
_ हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
भ्र. ध्व.९८६०८८३६१०
*************************



[24/04, 9:04 pm] +91 99607 20566: 🙏🙏
आजची कविता "आवेग "अत्यंत सुंदर लिहिली आहे
भावनांचा आवेग छान व्यक्त केला. समाजात घडणाऱ्या असामाजिक तत्वाविरुदध मांडलेल्या भावना छान आहे.
माननिय कवी कमलेश सोनकुसरे यांनी त्या घटनेचा योग्य विरोध आपल्या कवितेतून केला आहे.
अर्चना कोहळे
नागपूर
*************************



[24/04, 9:16 pm] +91 98608 83610: बलात्काऱ्यांना बलात्कार
करावयाला वयाची, जाती धर्माची अट नसते. आज समाजात माणुसकीला काळे फासणारे असे कितीतरी टवाळखोर आहेत. करून सवरून त्यातून सुटकेसाठी  दया याचना करतात. म्हणजे मुद्दाम लाथ हाणून पाया पडण्याचा हा प्रकार. अशा नराधमाची  कुणीही निर्भया शिकार होऊ नये. अशा आशयाची ही 'आवेग ' कविता. कवी कमलेश तु. सोनकुसळे यांनी या कवितेतून प्रामाणिक हेतु कथन केला आहे. अभिनंदन !
- हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी, भ्र. ध्व.
९८६०८८३६१०
*************************



[24/04, 9:51 pm] +91 99214 29995: आवेग,
        कमलेश सरांची कविता खुपच छान आहे, समाजात होणाऱ्या स्त्रियांवरील अत्याचार याला वाचा फोडण्याचं लिखाण या कवितेतून कवींनी अगदी, मनमोकळे पणाने सादर केले आहेत. मी तसा नवोदित कवि आहे. मला तेवढं भाष्य करता येणार तेवढं ज्ञान अवगत नाही. कविता आवडली, पुढील वाटचालीस  खुप खुप शुभेच्छा 🙏🙏

नितीन पवार..
*************************



[24/04, 9:58 pm] +91 99709 95657: आवेग या कवितेचे कवी कमलेश सरांचे अभिनंदन कारण अशा निच्च प्रव्रुतीना  आळा घालतांना नुसते निर्भया ग्रुहीत नाही तर खैरलांजी, खेर्डा किंवा माझ्याच गोसावी कुटूंबातील बहीणीवरील अत्याचार व जातीय समीकरणे देउन ...आपला तो बाप्या दुस-याचं ते कारटं करू नये ....अन्याय हा अन्यायच असतो... जातीय रंग देऊन चालणार नाही..... आम्ही करंटे जीथे तिथे जातीपातीचे लेबल लावत असतो...
आम्हची बहीण नाचली तर नाची... अनं त्यांची बहीण नाचली तर काय छान अभीनय... ही प्रवृत्ती टाळावी ही अपेक्षा.... कारण.. मी यातून होरपळलो म्हणून लिहीता झालो.... बाकी ...खुप आहे... आता एवढेच...
 कमलेश सर छान *आवेग*  संवेदनशील मनाचा गोषवारा ऊभा केला... धन्यवाद सर आपल्या लेखनीला सलाम👍👍 जे मला जमले नाही त्या भावना आपण मांडल्या व २० वर्षानंतर माझी कवीता मीळाली...🙏🙏👍👍🌹🌹
*************************





डॉ विजय सोरते यांची प्रतिक्रिया
*************************



[24/04, 10:18 pm] कमलेश सोनकुसळे: रसिकजनहो नमस्कार 🙏🙏
*आवेग* या रचनेतील काही शाब्दिक कोलाहल मनात होता.... सदर रचना मांडावी की नशिबानं दिलेलं फाटकं आभाळ घेऊन *शेतकरी बाप* ला आपल्या समोर मांडावा... याच विवंचनेत होतो... शेवटी आवेग आपल्यासमोर मांडला....
आपली तीक्ष्ण नजर(भावनात्मक) व लेखणी यांचा दुहेरी संगम होऊन समाजातील विविध पैलूंवरील आपले भाष्य मला निश्चितपणे पुढील लेखनास ऊर्जा मिळवून देतील, यात यत्किंचितही शंका नाही...
पुन्हा आपले लाख लाख धन्यवाद !
आपल्यासाठी *आवेग* ही कविता mp3 स्वरूपात मांडतो व आपली रजा घेतो.....

आपल्या सदैव ऋणात
कमलेश