अबोल अधरांना, सात सूर मिळावे
इंद्रधनु हृदयी, सप्त रंग बरसावे
नकळत जीवनी, विजयी सदा व्हावे
तराने क्षणोक्षणी, तार छेडीता जुळावे
ठाऊक त्या नदीला, तृप्त किनारे व्हावे
कस्तुरीचा गंध हा, चहूकडे दरवळे
रेघ वाळूवर मारता, स्वप्न साकार व्हावे
मिळता नवी दिशा, नवी आशा ही स्मरावे
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर