"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

बंदीस्त नाती

बंदीस्त नाती

पिकले पान ते, वाळले कधीचे
नियम जगाचे, पाळले कधीचे

सुगंध नात्यांचा, मनी  दरवळे
गजऱ्यात फुले, माळले कधीचे

नियतीने केली, थट्टा जगण्याची
हृदयी आसवे, ढाळले कधीचे

वार पाठीवरी, अकस्मात झाला
शब्द अंतरीचे, जाळले कधीचे

व्रण आजही ते, खुणावी नयनी
स्वप्न भविष्याचे, गाळले कधीचे

ती बंदीस्त नाती, वाचण्या चुकलो
पाने जखमांचे, चाळले कधीचे

व्यथा आठवांची, सातजन्मी मिळे
डाव संचिताचे, भाळले कधीचे

श्वासात गुंतली, अदृश्य लेखणी
लोंढे अक्षरांचे, टाळले कधीचे

© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372