संकल्प
विद्यार्थी घडवी l नेई उंचीवर l
सदा अग्रेसर l व्यक्तिमत्व ll
जागवी कर्तव्य l देह हा नश्वर l
जगती ईश्वर l माणूस हा ll
विश्व हेचि घर l करावे अर्पण l
होऊया दर्पण l इतरांशी ll
मनाचिया शांती l करून सत्कर्म l
मानवता धर्म l स्विकारूया ll
समाज कल्याणा l अनेकु विकल्प l
केलासी संकल्प l देहदान ll
एकचि हा ध्यास l विश्व कल्याणम् l
देह सार्थकम् l वाहियला ll
समाज वदला l बोले तैसा चाले l
त्यासी वंदू भले l या जगती ll
© कमलेश सोनकुसळे, काटोल
![]() |
संकल्प |