हायकू - राजेश वैरागडे
●●●◆◆ 29/08/2020◆◆●●●
आपणा सर्वांना माहीत असेलच की हायकू हा मूळ जपानी काव्यप्रकार आहे. हा काव्यप्रकार आपल्या संस्कृतीतील नसल्यामुळे याबाबत बरेच भ्रम निर्माण झालेले आहेत. अल्पाक्षर महत्त्व असलेला हा काव्यप्रकार मराठीत तरी अजून रूजलेला नाही शिवाय मराठी भाषेत ज्याप्रमाणे गझल हा प्रकार रूजला त्याप्रमाणे हायकू अध्याप रुजलेला नाही.
हायकू या प्रकाराबाबत संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच समज किंवा गैरसमज निर्माण झालेले आहेत. म्हणून हायकू समजून घेताना कृपया आपल्या डोक्यात हायकूविषयी जे काही समज-गैरसमज निर्माण झाले असतील ते कृपया बाजूला ठेवून या कार्यशाळेतील सूचनांना अगदी पहिल्यांदा आपण ऐकतोय असा विचार करून, म्हणजे कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता या कार्यशाळेत आपण हजर राहिलात तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल असे मला वाटते
[29/08, 5:23 pm] Rajesh Vairagade: हायकू व गझल हे दोन्ही काव्यप्रकार आपल्या मातीतील नाहीत. परंतु गझल हा काव्यप्रकार येथे रुजला तसा हायकू का रुजू शकला नाही याला कारण म्हणजे गझल हा प्रकार मूळ फारसी किंवा अरबी भाषेशी संबंधित असल्यामुळे व त्याचे साधर्म्य उर्दूशी आहे. उर्दू आपल्यास परिचित आहे आणि म्हणून आपण गझल लवकर ग्रहण केली किंवा गझल आपल्याला पचनी पडली. परंतु हायकूबाबत तसे झालेले नाही. हायकू हा जपानी भाषेतील प्रकार. जपानी भाषा ही आपल्यासाठी अपरिचित असल्यामुळे मूळ जपानी हायकूशी आपला परिचय फारच कमी प्रमाणात झालेला आहे. हायकूला मराठीत आणण्याचे श्रेय आचार्य अत्रे यांच्या कन्या सौ. शिरीष पै यांच्याकडे जाते हे आपणा सर्वांना ठाऊक आहेच.
[29/08, 5:26 pm] Rajesh Vairagade: प्रसिद्ध कवयित्री शिरीष पै हे जपानी हायकूविषयी म्हणतात, "जपानी काव्याच्या संकेताप्रमाणे निसर्गाच्या घटनेशी जेव्हा आपण संबंधित असतो त्याच वेळी तो आपल्याला अस्सल स्वरुपात भेटतो. निसर्गातील एखादे दृश्य किंवा एखादी नाट्यपूर्ण घटना कवी बघतो आणि अचानक त्या दृश्याशी, घटनेशी त्याच्या अंतर्मनाची तार जुळून जाते आणि त्या विशिष्ट क्षणाची नोंद तो हायकूत घेतो."
[29/08, 5:26 pm] Rajesh Vairagade: या विधानाचा अर्थ असा की मूळ जपानी हायकू हा निसर्ग घटनेशी संबंधित असतो. निसर्गाशी संबंधित असलेला हायकू हा शुद्ध जपानी हायकू समजला जातो.
[29/08, 5:43 pm] Rajesh Vairagade: म्हणजे एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आलेली असणार की आपल्याला शुद्ध हायकू शिकायचा आहे तर निसर्ग घटना जिथे नाही त्याला आपण शुद्ध हायकू म्हणू शकणार नाही.
[29/08, 6:08 pm] Rajesh Vairagade: निसर्गात घडलेल्या घटनेचा संबंध जर नसेल तर त्याला हायकू म्हणता येत नाही. मुळात निसर्ग घटना व त्याचा मानवी जीवनाशी संबंध जोडून त्यातून संदेश द्यावयाचा असतो तो हायकूत हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे.
[29/08, 6:10 pm] Rajesh Vairagade: गझलेप्रमाणे काही काळ मनावर ताबा मिळवलेल्या भावनांचे ते वर्णन नव्हे,
अथवा एखाद्या कवितेप्रमाणे निसर्गाच्या रूपाचे शांतपणे केलेले वर्णनही नव्हे.
हायकू म्हणजे अचानक अदभूत काहीतरी पाहून निघालेला उत्स्फूर्त उ द् गार आहे.
[29/08, 6:11 pm] Rajesh Vairagade: हायकू म्हणजे एक विशिष्ट क्षण. तो शब्दात टिपायचा.
हायकू म्हणजे निसर्गात प्रत्यक्ष घडत असलेल्या घटनेचे टिपण.
[29/08, 6:13 pm] Rajesh Vairagade: निसर्गात घडत असलेल्या घटनेतून क्षण टिपायचा व तो मानवी जीवनाची जोडायचा. असे हायकूत घडत असते.
हायकू च्या प्रत्येक ओळीत व्यक्त केलेली भावना अथवा घटना हा स्वतंत्र अविष्कार असतो.
[29/08, 6:13 pm] Rajesh Vairagade: हायकूतील दोन ओळी वा घटना या विरोधाभासी असणे आवश्यक असते.
शेवटची ओळ ही अपूर्ण व सांकेतिक स्वरूपाची असते.
थोडक्यात हायकू म्हणजे अडीच ओळींचा अपूर्ण अविष्कार.
शेवटची अर्धी ओळ ही वाचकांनी आपापल्या कुवतीप्रमाणे पूर्ण करायची असते.
[29/08, 6:15 pm] Rajesh Vairagade: हायकू हा कधीही नकारार्थी वा नकारात्मक नसतो.
शुद्ध हायकू हा सकारात्मकतेकडे नेणारा जीवनाच्या समृद्धीचा संदेश देणारा असावा.
निसर्गाच्या मर्यादेबाहेरचे क्षण टिपणारा हायकू हा शुद्ध नसतो. म्हणून मूळ हायकूचे पावित्र्य आपण टिकवले पाहिजे या मताचा मी आहे.
[29/08, 6:57 pm] Rajesh Vairagade: हायकू हा पूर्णपणे व्यक्त केलेला अविष्कार कधीही नसतो. हायकू ही अपूर्ण कविता असते. हायकू काराने व्यक्त केलेला हायकू हा वाचकाने पूर्ण करायचा असतो स्वतःच्या कुवतीप्रमाणे.
[29/08, 6:57 pm] Rajesh Vairagade: अडीच ओळींचा अपूर्ण अविष्कार म्हणजे हायकू
[29/08, 6:59 pm] Rajesh Vairagade: प्रत्यक्षात निसर्गात घडलेली घटना जोपर्यंत आपण बघत नाही, अनुभवत नाही, व त्यावर विचार करत नाही तोपर्यंत खरा हायकू निर्माण होऊच शकत नाही.
[29/08, 7:06 pm] Rajesh Vairagade: हायकूची ही विभागणी तीन ओळींमध्ये केलेली असते.
पहिल्या ओळीत मूळ जपानी काव्य प्रकाराप्रमाणे 5 (syllables) ध्वनी चिन्हे.
दुसऱ्या ओळीत सात
व तिसऱ्या ओळीत पाच
अशाप्रकारे करणे अपेक्षित असते.
[29/08, 7:07 pm] Rajesh Vairagade: रचनेच्या दृष्टीने हायकू तीन भागात विभागला जात असतो.
1. निसर्ग किंवा भोवतीचे वातावरण
2. घडलेली एखादी घटना
3. निसर्ग किंवा वातावरणात झालेला बदल
●●●◆◆ 30/08/2020◆◆●●●
[30/08, 8:03 pm] Rajesh Vairagade: हायकूचे तंत्र याविषयीचे काही ठळक मुद्दे सर्वप्रथम आपण विचारात घेऊ या.
[30/08, 8:03 pm] Rajesh Vairagade: रचनेच्या दृष्टीने हायकू तीन भागात विभागला जात असतो.
1. निसर्ग किंवा भोवतीचे वातावरण
2. घडलेली एखादी घटना
3. निसर्ग किंवा वातावरणात झालेला बदल
[30/08, 8:04 pm] Rajesh Vairagade: हायकूची ही विभागणी तीन ओळींमध्ये केलेली असते.
पहिल्या ओळीत मूळ जपानी काव्य प्रकाराप्रमाणे 5 (syllables) ध्वनी चिन्हे.
दुसऱ्या ओळीत सात
व तिसऱ्या ओळीत पाच अशाप्रकारे करणे अपेक्षित असते.
[30/08, 8:05 pm] Rajesh Vairagade: अशाप्रकारे एकंदर 17 syllables असणारी ही रचना म्हणजे हायकू असते.
जपानी ही भाषा चित्रात्मक स्वरूपाची असल्यामुळे मराठीत आणताना त्यात बऱ्याच अडचणी निर्माण होत असतात.
[30/08, 8:06 pm] Rajesh Vairagade: मराठीमध्ये तज्ञांच्या मते हायकू मूळ स्वरूपात व्यक्त करायचा असेल तर वर्णाक्षरातील अक्षरांचा वापर ध्वनीचिन्हांऐवजी केल्यास मूळ हायकूची मजा येऊ शकेल.
[30/08, 8:14 pm] Rajesh Vairagade: याचा अर्थ असा की मराठी हायकूत ध्वनीचिन्ह वापरणे व्यावहारिक नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे जपानी हायकूुत ध्वनीचिन्हे असतात त्या ध्वनीचिन्हाच्या ऐवजी मराठीत लिहिताना तिथे शब्द चिन्हे अगर वर्णचिन्ह वापरावे
[30/08, 8:28 pm] Rajesh Vairagade: अपवादात्मक परिस्थितीत काही हायकू 5-7-5 एवजी 7-9-7 असेही मान्य असतात. प्रसिद्ध हायकूकार व अभ्यासक श्री सुरेश मथुरे यांनी आपल्या हायकू संशोधनात्मक लिखाणात तसे नोंदवले आहे.
त्याचे एक उदाहरण मी खाली देत आहे. 👇
[30/08, 8:29 pm] Rajesh Vairagade: तुझ्या अश्रुंचा भार
फाटलं पांढरं आभाळ
पिऊ ना दे ती धार
*राजेश वैरागडे*
[30/08, 8:31 pm] Rajesh Vairagade: ही रचना अपवादात्मक आहे.
फक्त उदाहरण द्यावे म्हणून मी तुम्हाला ही दिलेली आहे.
अशा रचनेचा सराव कृपया करू नये.
मी विविध प्रयोग करीत असल्यामुळे अशा रचना मी जाणीवपूर्वक लिहत असतो
[30/08, 8:43 pm] Rajesh Vairagade: तुझ्या अश्रुंचा भार
फाटलं पांढरं आभाळ
पिऊ दे ना ती धार
*राजेश वैरागडे*
[30/08, 8:45 pm] Rajesh Vairagade: प्रेयसीचे दुःख पिण्याची अभिलाषा असणाऱ्या प्रियकराची ती भावना आहे.
याचा दुसरा अर्थ पाडेकर साहेब म्हणतात तसाही असू शकतो
[30/08, 8:59 pm] Rajesh Vairagade: प्रतीक नकारात्मक असली तरी हायकूत हरकत नसते. फक्त त्यातून मिळणारा संदेश हा नकारात्मक नसावा
●●●◆◆ 06/09/2020◆◆●●●
[06/09, 6:15 pm] Rajesh Vairagade: हायकूची ही विभागणी तीन ओळींमध्ये केलेली असते.
पहिल्या ओळीत मूळ जपानी काव्य प्रकाराप्रमाणे 5 (syllables) ध्वनी चिन्हे.
दुसऱ्या ओळीत सात व तिसऱ्या ओळीत पाच अशाप्रकारे करणे अपेक्षित असते.
[06/09, 6:16 pm] Rajesh Vairagade: रचनेच्या दृष्टीने हायकू तीन भागात विभागला जात असतो.
1. निसर्ग किंवा भोवतीचे वातावरण
2. घडलेली एखादी घटना
3. निसर्ग किंवा वातावरणात झालेला बदल
[06/09, 6:17 pm] Rajesh Vairagade: हायकू ला होक्कू असेही म्हणतात.
हायकू हा एक उत्स्फूर्त उद्गार आहे.
गझलेप्रमाणे काही काळ मनावर ताबा मिळवलेल्या भावनांचे ते वर्णन नव्हे, अथवा एखाद्या कवितेप्रमाणे निसर्गाच्या रूपाचे शांतपणे केलेले वर्णनही नव्हे.
हायकू म्हणजे अचानक अदभूत काहीतरी पाहून निघालेला उत्स्फूर्त उद् गार आहे. हायकू म्हणजे एक विशिष्ट क्षण.
तो शब्दात टिपायचा.
हायकू म्हणजे निसर्गात प्रत्यक्ष घडत असलेल्या घटनेचे टिपण.
निसर्गात घडत असलेल्या घटनेतून क्षण टिपायचा व तो मानवी जीवनाची जोडायचा. असे हायकूत घडत असते.
हायकू च्या प्रत्येक ओळीत व्यक्त केलेली भावना अथवा घटना हा स्वतंत्र अविष्कार असतो.
हायकूतील दोन ओळी वा घटना या विरोधाभासी असणे आवश्यक असते.
शेवटची ओळ ही अपूर्ण व सांकेतिक स्वरूपाची असते.
थोडक्यात हायकू म्हणजे अडीच ओळींचा अपूर्ण अविष्कार.
शेवटची अर्धी ओळ ही वाचकांनी आपापल्या कुवतीप्रमाणे पूर्ण करायची असते.
हायकू हा कधीही नकारार्थी वा नकारात्मक नसतो.
शुद्ध हायकू हा सकारात्मकतेकडे नेणारा जीवनाच्या समृद्धीचा संदेश देणारा असावा.
निसर्गाच्या मर्यादेबाहेरचे क्षण टिपणारा हायकू हा शुद्ध नसतो.
[06/09, 6:20 pm] Rajesh Vairagade: हायकूबाबत अनेक मतमतांतरे आहेत.
शिरीष पै यांनी मराठीत हायकू आणतांना नियम शिथिल केले.
तीन पैकी कोणत्याही दोन ओळीत यमक साधले गेलेच पाहिजे असे त्यांनी सांगितले.
शेवटच्या ओळीत कलाटणी आवश्यक आहे आणि ती शक्यतो निसर्गावर असावी असं त्यांचं म्हणणं आहे.
परंतु मूळ मूळ जपानी हायकूमध्ये यमकाचे अजिबात बंधन नाही.
हायकूत अक्षरछंद पाळल्या जाते.
वाचक हे हायकू स्वतःच्या मनात पूर्ण करीत असतात.
मात्सुओ बाशो हा सतराव्या शतकातला नावाजलेला जपानी हायकूकार होता. त्याने हायकूुला जगात ओळख निर्माण करून दिली.
मात्र त्याच्या हायकूमध्ये सुद्धा त्याने यमकांची सक्ती केलेली नाही. ही यमकांची सक्ती हायकूचे मराठीकरण झाल्यानंतर आपण तयार केलेली आहे.
[06/09, 6:52 pm] Rajesh Vairagade: *हायकूचा उद्देश काय?*
1. वाचकाला एखाद्या घटनेचा हुबेहूब अनुभव देणे.
2. हायकू लिहिणाऱ्याच्या अनुभव, भावना, इच्छा, विचार इत्यादीचा कोणताही परिणाम न होऊ देता शुद्ध स्वरूपात तो क्षण वाचकापर्यंत पोहोचवणे हा उद्देश असतो.
3. हायकूमध्ये यमक नसतो. किंबहुना हायकूत यमक नसावा. मात्र मराठी हायकूलेखन करताना आपण शिरीष पै यांनी केलेल्या बदलाप्रमाणे यमक मान्य केलेला आहे. परंतु त्याची सक्ती नसावी.
4. वाक्य लेखनाचे नियम लवचिक असावे.
5. अस्सलपणा व्यक्त होण्यावर भर असावा.
6. विरामचिन्हांची बळजबरी नसावी. ती पूर्णतः हायकूकारावर अवलंबून असावी.
7. हायकूला शीर्षक असतो. नसल्यास पहिल्या ओळीला शीर्षक बनवता येते.
8. हायकू हे नेहमी वर्तमान काळातच असतात.
[06/09, 6:53 pm] Rajesh Vairagade: *हायकू लिहिताना हे करू नका.*
1. हायकू लिहिताना स्वतःच्या कल्पना, भावना वा कथा इत्यादी वापरू नका
2. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वाक्प्रचार वापरू नका. (figure of speech)
3. अस्पष्ट, संदिग्ध, गुंतागुंतीचे वा शब्दबंबाळ (पाल्हाळीक भाषा) वापरू नका.
4. अनावश्यक मजकूर टाकू नका.
5. हायकूत अनावश्यक लांबी टाळा. (एका श्वासात म्हणता येईल असा असावा)
[06/09, 7:05 pm] Rajesh Vairagade: प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे मत "तीन ओळींचा अल्पाक्षरी आणि गतिमान रचनाबंध हे मूळ जपानी हायकू चे रूप. चित्रमयता, भावोत्कटता, निसर्ग आणि मानव यातील अभेद्यता, अल्पाक्षर रमणीयता, धावता क्षण शब्दबद्ध करून त्याला चिरस्थायी रूप देण्याची प्रवृत्ती, निसर्गाची ओढ व जीवनचिंतन हे हायकूचे ठळक वैशिष्ट्ये. यातून मूळ हायकूचा रूपबंध स्पष्ट होतो. पहिल्या दोन ओळीत जी कल्पना असते त्याला एकदम धक्का देणारी वेगळीच कल्पना तिसऱ्या ओळीत असते. आशय कोणत्याही प्रकारचा असो, ही तांत्रिक बाजू यात प्रकर्षाने जपली जाते"
[06/09, 7:24 pm] Rajesh Vairagade: जपानमधील मूळ हायकू परंपरेचे मूळ झेन तत्वज्ञानाशी निगडीत आहे. जपानी हायकूकारांवर या तत्त्वज्ञानाचा प्रभाव यातूनच हायकूचा विकास झालेला आहे. झेन तत्वज्ञान व त्यातून उदयास आलेली चिनी चित्रकलेची एक शाखा यांचा मोठा प्रभाव हायकूवर आहे. वर्तमान क्षण सर्व संवेदना शक्तीसह उत्कटतेने व पूर्णत्वाने जगणे आणि माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग मानणे ही झेन तत्वज्ञानाची तत्वे हायकू रचनेत अतिशय प्रेरणादायी ठरलेली आहेत. हीच हायकू ची संस्कृती आहे जी मूळ हायकूत राखली जात असते.
[06/09, 7:27 pm] Rajesh Vairagade: हायकू हे वाड़मयीन चित्र असले पाहिजे. चित्रकार चित्र काढताना रंगांचा उपयोग करतो, काही जागा मोकळ्या सोडतो व त्याच्या मनात उमटलेले भाव तुमच्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न करतो. प्रेक्षक रंगसंगती, रेखा, मोकळी जागा सर्वांचा एकत्र विचार करून चित्रकाराच्या भावनेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तसे हायकू वाचताना व्हावयास पाहिजे.
[06/09, 7:38 pm] Rajesh Vairagade: Starting verse doesn't means complete poetry. Haiku is just a symbolic incomplete poetry, that should be complete by the audience by there own.
[06/09, 7:38 pm] Rajesh Vairagade:
Always salty
ocean cries
in her eyes.
[06/09, 7:40 pm] Rajesh Vairagade: इंग्रजी हायकू हे जपानी प्रमाणे असतात त्यात शब्दांपेक्षा ध्वनी चिन्हांचा विचार केला जातो.
◆◆◆ 19/09/2020◆◆◆
[19/09, 6:30 pm] Rajesh Vairagade: बाशोचा एक मूळ जपानी हायकू मी आपल्यासमोर येथे टाकत आहे. त्याचे कृपया सर्वांनी अवलोकन करावे
[19/09, 6:32 pm] Rajesh Vairagade: Furu ike ya
Kawazu tobikomu
Mizu no ota
*Matsuo Basho*
[19/09, 6:33 pm] Rajesh Vairagade: जपानी लिपीत तो टाकता येणे शक्य नसल्यामुळे त्याचे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही लिपीत आपल्यासमोर टाकत आहे.
फुरु इके या
कावाझू तोबिकोमू
मिझू नो ओटो
*मात्सुओ बाशो*
[19/09, 6:37 pm] Rajesh Vairagade: तळ्यात तळे
तळ्यात तळे
तळ्यात डुबुक
[19/09, 6:37 pm] Rajesh Vairagade: या हायकूचा शिरीष पै यांनी केलेला स्वैर अनुवाद खालीलप्रमाणे
[19/09, 6:39 pm] Rajesh Vairagade: शिरीष पै यांनी केलेला हा अनुवाद स्वैर स्वरुपाचा आहे. यात जपानी हायकूचे मूळ नियम जसेच्या तसे पाळण्यात आलेले नाहीत.
[19/09, 6:39 pm] Rajesh Vairagade: मूळ नियम पाळूनसुद्धा हायकूचा अनुवाद केला जाऊ शकतो. तो मी खाली देत आहे.
[19/09, 6:40 pm] Rajesh Vairagade: शांत तळ्यात
बेडूक सूर मारी
नाद तरंगे
[19/09, 6:40 pm] Rajesh Vairagade: old pond
frogs jumped in
sound of water
[19/09, 6:40 pm] Rajesh Vairagade: जुनाट तळे
बेडूक मारे सूर
पाण्याचा ध्वनी
[19/09, 6:41 pm] Rajesh Vairagade: आपल्या हे लक्षात आले असेल की शिरीष पै यांनी केलेला स्वैर अनुवाद हा जरी तांत्रिक दृष्ट्या चुकीचा वाटत असला तरीसुद्धा त्यात मूळ हायकूचे सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु नंतरच्या उदाहरणांमध्ये तांत्रिकदृष्ट्या हायकूेचे भाषांतर करीत असताना मूळ हायकूचा प्राण कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो.
[19/09, 6:42 pm] Rajesh Vairagade: याचा अर्थ असा की मूळ हायकूचे भाषांतर करीत असताना त्यातील सौंदर्य नष्ट होऊ नये. परंतु मराठीत आपण जेव्हा नव्याने हायकूची निर्मिती करतो त्यावेळेला मात्र हायकू चे मूळ नियम हे पाळायला हवेत. 5-7-5 चा नियम हा आपण पाळायलाच हवा.
[19/09, 6:45 pm] Rajesh Vairagade: अर्थात जेव्हा एखाद्या मूळ हायकू चे आपल्या भाषेत रूपांतर करायचे असेल तेव्हा त्या हायकूचे सौंदर्य अबाधित ठेवणे हे भाषांतरकाराचे कर्तव्य आहे. त्यात नियम पाळला गेला नाही तरीही फार फरक पडत नाही. परंतु आपण जेव्हा आपल्या भाषेत हायकू करतो त्या वेळेला मात्र हायकू चे सर्व नियम पाळायला हवेत.
[19/09, 6:49 pm] Rajesh Vairagade: हायकू हा जपानी काव्यप्रकार मराठीत पचनी पडणे फार अवघड आहे. मूळ जपानी शुद्ध स्वरूप कायम ठेवता येणे शक्य नसेल तर मराठीत हायकू लिहूच नयेत असे माझे मत आहे. मराठीत चारोळीसारखा अल्पाक्षरी प्रकार आहे व्यक्त व्हायला. मग उगीच कशाला जपानी हायकू ला भ्रष्ट करायचे. जपानी हायकू तिचे पावित्र्य कायम ठेवूनच मराठी किंवा इतर भाषांमध्ये लिहिता आले तर उत्तम. म्हणून 5-7-5 हा नियम व इतर हायकू चे नियम पाळूनच तो लिहावा तरच त्याचे सौंदर्य अनुभवता येते.
[19/09, 7:15 pm] Rajesh Vairagade: हायकू सारखे जपानमध्ये आणखी काही काव्यप्रकार आहेत.
Monoku : एकाच आडव्या ओळीत व्यक्त होणारा काव्यप्रकार आहे.
Waka : हा जपानचा सर्वात जुना काव्यप्रकार आहे.
Tanka : या काव्य प्रकारात पाच ओळी असतात 5-7-5-7-7 अशी ही रचना असते. तांका या काव्यप्रकारातूनच हायकू उदयास आलेला आहे.
आपल्याला अधिक ज्ञानासाठी मी ही माहिती दिलेली आहे. 🙂
[19/09, 7:18 pm] Rajesh Vairagade: जपानमधील मूळ हायकू परंपरेचे मूळ झेन तत्वज्ञानाशी निगडीत आहे.
जपानी हायकूकारांवर या तत्त्वज्ञानाचा प्रभाव यातूनच हायकूचा विकास झालेला आहे.
झेन तत्वज्ञान व त्यातून उदयास आलेली चिनी चित्रकलेची एक शाखा यांचा मोठा प्रभाव हायकूवर आहे.
वर्तमान क्षण सर्व संवेदना शक्तीसह उत्कटतेने व पूर्णत्वाने जगणे आणि माणूस हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग मानणे ही झेन तत्वज्ञानाची तत्वे हायकू रचनेत अतिशय प्रेरणादायी ठरलेली आहेत.
हीच हायकू ची संस्कृती आहे जी मूळ हायकूत राखली जात असते.
[19/09, 7:20 pm] Rajesh Vairagade: हायकूत प्रसंग निवडताना गोंधळून जाऊ नका. नेमका आपल्याला कोणता प्रसंग आणि कशाकरता निवडायचा आहे याची स्पष्टता आपल्या मनामध्ये आधी व्हायला हवी.
[19/09, 7:22 pm] Rajesh Vairagade: तिसरी ओळ ही फार महत्वाची असते.
या तिसऱ्या ओळीत आपण पहिल्या दोन ओळीत मांडलेल्या घटनेमध्ये कुठेतरी कलाटणी देणे हे आवश्यक असते व त्यातून चमत्कृतीपूर्ण असा अर्थ निघायला हवा.
[19/09, 7:23 pm] Rajesh Vairagade: आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे सूक्ष्मपणे निरीक्षण करा.
एखाद्या क्षणी घडलेल्या एखाद्या घटनेचे बारकाईने निरीक्षण करून या घटनेचे मानवी जीवनाशी काही संबंध जोडता येईल काय याचा कटाक्षाने विचार करावा व तो शक्य असल्यास त्यात विसंगती दर्शवता येईल काय असेही बघावे.
शेवटी तिसरी ओळ ही पूर्णपणे चमत्कृतीपूर्ण, कलाटणी देणारी व एखादा संदेश प्रसारीत करणारी असावी.
अशी रचना करण्यात यावी. त्यासाठी घाई न करता निवांतपणे, शांतपणे व एखाद्या निष्पाप बालकाप्रमाणे विचार करावा.
आपल्या मनामध्ये असलेल्या पूर्वग्रहांना कधीही थारा देऊ नये तरच आपण उत्तम हायकू तयार करू शकतो.
[19/09, 7:25 pm] Rajesh Vairagade: हायकूची रचना करताना ते नेहमी वर्तमान काळातच असावेत याचा कटाक्ष पाळावा
[19/09, 7:27 pm] Rajesh Vairagade: प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे मते "तीन ओळींचा अल्पाक्षरी आणि गतिमान रचनाबंध हे मूळ जपानी हायकू चे रूप. चित्रमयता, भावोत्कटता, निसर्ग आणि मानव यातील अभेद्यता, अल्पाक्षर रमणीयता, धावता क्षण शब्दबद्ध करून त्याला चिरस्थायी रूप देण्याची प्रवृत्ती, निसर्गाची ओढ व जीवनचिंतन हे हायकूचे ठळक वैशिष्ट्ये. यातून मूळ हायकूचा रूपबंध स्पष्ट होतो. पहिल्या दोन ओळीत जी कल्पना असते त्याला एकदम धक्का देणारी वेगळीच कल्पना तिसऱ्या ओळीत असते. आशय कोणत्याही प्रकारचा असो, ही तांत्रिक बाजू यात प्रकर्षाने जपली जाते"
[19/09, 7:28 pm] Rajesh Vairagade: माझी सर्वांना अशी विनंती आहे की हायकू लिहीत असताना हा अल्पाक्षरी प्रकार लिहिण्याची घाई करू नये.
आपण जेव्हा अल्प अक्षरातील हायकू तयार करतो तेव्हा त्या हायकूशी संबंधित सर्व मुद्द्यांचा मनामध्ये अत्यंत सूक्ष्मपणे विचार करून सराव केल्यानंतर मगच तो कागदावर लिहावा जेणेकरून अधिकाधिक अचूकता टिकून राहील.
[19/09, 7:30 pm] Rajesh Vairagade: हायकू चा हा प्रवास उत्तरोत्तर उर्ध्व दिशेला जायला हवा आणि मला वाटतं की आपण गांभीर्याने हायकूविषयी सजग राहिलो तर निश्चितपणे आपण मानवी हायकूकडून खर्या मूळ हायकूकडे लवकरच जाऊ शकतो.
[19/09, 7:32 pm] Rajesh Vairagade: मला सर्वांना एक सांगायचं आहे की हायकू हा बंद खोलीत कल्पनाविस्तार करून रचता येत नाही.
पटापट हायकू रचण्याचा हव्यास आपल्याला हायकू पासून दूर घेऊन जात असते.
[19/09, 7:39 pm] Rajesh Vairagade: निश्चित. इतर विषयांतही समाविष्ट केला जाऊ शकतो. परंतु हायकू मध्ये कोणत्याही विषयाचा समावेश करताना त्याचा संबंध निसर्गाशी जोडणे हे आवश्यक असते. निसर्गातून प्रतिमा किंवा घटना उचलून त्याचा संबंध मानवी जीवनाशी जोडायचा असा प्रकार हायकूत असतो.
[19/09, 7:40 pm] Rajesh Vairagade: निसर्गात घडलेल्या घटनांचा उल्लेख किंवा त्याची दखल जर हायकूत नसेल तर तो शुद्ध होणार नाही. त्याला मानवी हायकूचे स्वरूप मिळेल.
[20/09, 6:04 pm] Rajesh Vairagade:
सूर्याची आग
अखंड मरगळ
छायेची आस
असे केल्यास हायकूच्या जास्त जवळ जाता येईल.