वेध घ्यावा नशिबाचा,
काबीज करावा किल्ला,
शिखरावरच्या यशाचा.
सुगंधी गुलाब होऊन,
वेध घ्यावा काट्यांचा,
उन्हातही खेळता यावा,
खेळ हा सावल्यांचा.
कल्पनेत मग्न होऊन,
वेध घ्यावा शब्दांचा,
विरहातही वाटावा,
क्षण प्रत्येक प्रेमाचा.
स्वच्छंद भरारी मारून,
वेध घ्यावा गगनाचा,
हळूच शोधता यावा,
सूर्य या जीवनाचा.
रचना: कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372