हुकुमाचा पत्ता
महाराष्ट्राच्या विक्रीला म्हणे
आता सुरुवात झाली आहे
सत्तेच्या चाव्या आमच्याच कडे
दुसरा कोण याचा वाली आहे
आधी लग्न कोंढाण्याचे म्हणून
तानाजीने लढविली खिंड आहे
भाडे तत्वावर देऊ म्हणे गढ किल्ले
ही तर राजेंच्या विचारांची धिंड आहे
अहो, गढ काय अन् किल्ला काय
बघा आता यांचीच सत्ता आहे
सत्तेवरून खेचून दाखवा जागा
मतदान हा हुकुमाचा पत्ता आहे
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२