गझल - धूडवळ
(भूपति - मात्रा १०+१२)
काल धुडवळीची चर्चा फारच झाली
जुन्या जिवलगांची चर्चा फारच झाली
रंगात माखून कसे वागले सारे
रंगल्या मुखाची चर्चा फारच झाली
केलेत उपदेश मोठ्यांनी हजारदा
थोडके पिण्याची चर्चा फारच झाली
नकार देता तो पेला कसा रिचवला
त्याच मुखवट्याची चर्चा फारच झाली
घेता सोंगे रे ओळख अता पटेना
या गणगोतांची चर्चा फारच झाली
मरणाने माझ्या व्यथेस उजवले अता
रांगड्या क्षणांची चर्चा फारच झाली
© कमलेश सोनकुसळे, काटोल
गझल - धूडवळ (एकूण मात्रा - 23)
रात्रीस धुडवळीची चर्चा फार झाली
जुन्या रे जिवलगांची चर्चा फार झाली
रंगात माखून सारे वागतात गड्या
रंगल्या चेहऱ्याची चर्चा फार झाली
उपदेश मोठ्यांनी केले मज हजारदा
थोडके पिण्याची मग चर्चा फार झाली
नकार देता त्यांनी तो पेला रिचवला
त्यांच्याच मुखवट्याची चर्चा फार झाली
घेता सोंगे कितीतरी ओळख पटेना
गणगोत नि नात्याची चर्चा फार झाली
मरणाने या वेदनेला उजवले अता
छळलेल्या जगण्याची चर्चा फार झाली
© कमलेश सोनकुसळे, काटोल