♦️ *निशू शब्दिका*
*निशू शब्दिका* काव्यप्रकार हा अतिशय सुंदर काव्यप्रकार आहे...
*सौ. निशा डांगे यांनी या काव्याची निर्मिती केली आहे.* त्यांचे प्रथम आभार मानूया या सुंदर काव्यप्रकारासाठी..🙏
नियम: ✍️
🔸*पहिल्या ओळीत अन् चवथ्या
ओळीत सात वर्ण असलेले शब्द.*
🔸*दुसऱ्या अन् तीसऱ्या ओळीत पाच वर्ण असलेले शब्द.*
🔸यमकजोडणी: *दुसऱ्या आणि चवथ्या ओळीत यमक साधायचे*..
🔸*चार किंवा पाच कडव्यापर्येंत रचना असावी.*
🔸आकृतीबंध: ७-५-५-७
🔸 *कवितेला लय,आशय,व्याकरण असावे.*
*उदाहरण*
* काव्यप्रकार : निशू शब्दिका
विषय: 'स्वर्गसुख'
ईश सहवासात
नाहीच दु:ख
त्याच्या भक्तीत
मिळते स्वर्गसुख-१-
मनाच्या सिंहासनी
तुच बसावा
मज संगती
सदैव तू असावा-२-
इंद्रियदमन हे
तूची शिकवी
षडरीपूंची
घाणं तूची घालवी-३-
भौतीक पदार्थात
कधीच सुख
नाही लाभत
पदरी पडे दु:ख-४-
(सौ.सुधा जाधव)