पावसाचा तडाखा
पावसाच्या तडाख्याने
गाव समधं बेजार आहे
पाणी वाहणाऱ्या नाल्या
अजून तरी संपावर आहे
पायी चालताना बघ गड्या
गड्ड्यांचा सुमार मार आहे
रस्त्यात गड्डे की गड्यात रस्ता
हा प्रश्न विचारांच्या पार आहे
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२