कोल्होबाचा दवाखाना
एकदा बघा काय झालं
कोल्होबा झाला डॉक्टर
चिट्ठी फाडण्यात पटाईत
ससा झाला कंपाउंडर
माकडाला सुटली खाज
धावत आला दवाखान्यात
उड्या मारायच्या म्हणाला
बरं करा एका झटक्यात
हत्ती खाण्यात पटाईत
खाऊन खाऊन झाला भारी
औषध घेतले तरी गड्या
तब्येत नाही झाली बरी
डरकाळी फोडत सिंहाला
घेऊन आला पट्टेदार वाघ
सलाईन लावली त्याला
चटकन गेला त्याचा ताप
अचानक किडले दोन दात
जोडत आला उंदीर हात
कोल्होबाने तपासले त्याला
उंदराने दिले रुपये सात
गर्दी व्हावी तिथे म्हणून
कोल्ह्याने केली लबाडी
तब्बेत सगळ्यांची ठीक तरी
वाटली औषधी थोडी थोडी
© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२