मोगरा
बाहुपाशात येता.. चंद्र खुलला असावा
केलेत वार हृदयी.. तो मोगरा असावा
फुलांच्या जगती.. खुद्द सजला असावा
मनही झाले सुगंधित.. तो गजरा असावा
गुलाब जाई जुई.. अन केवडा असावा
अलगदच केसांत.. तो माळला असावा
हृदयात प्रीतीचा.. मळा फुलला असावा
घेतले आवेशात.. तो भोवरा असावा
टिपताना मकरंद.. स्वर्ग भेटला असावा
पाहून तुझी अदा.. तो लाजरा असावा
जुळेना मन आता... ओठी हसला असावा
मुखवट्यात तिचा.. तो चेहरा असावा
© कमलेश सोनकुसळे