"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

आसवांचा बांध



रंगलो किती तुझ्यासवे
रंगण्याची ती गोडी नाही
डोळ्यात अश्रू तरले
हुंदका तो ओठी नाही

श्वासाचा प्रीती सुगंध
काही केल्या सरत नाही
तुझी मिठी सैल अशी
कधी घट्ट झालीच नाही

प्रेम करावं निथळ
हृदयी ते भाव नाही
आठवणींच्या किनारी
वसले माझे गाव नाही

विरहात गुणगुणावं
एकटा मात्र मीच नाही
घायाळ झालो कधीचा
नजरेचा तो तीर नाही

आसवांचा बांध आता
नव्याने तो फुटत नाही
दिलेल्या आणाभाका
काही केल्या रुसत नाही

हृदय झाले बेजार कधी
मला कसे कळले नाही
घाव सोसण्या मी काही
मोगरा तर नक्कीच नाही

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372