"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

श्रावणसरी

श्रावणसरी

पावसाचा असे
मनी कयास
होई आनंद
धावताना मृगास

श्रावण मासी
हर्ष मनी
सरी पडता
ओली धरणी

श्रावण येता
पसरे हिरवळ
मातीचा गंध
चहूकडे दरवळ

पडता हळूच
श्रावण सरी
पावशा गातो
मोद बासरी

श्रावण सरीने
वाहे निर्झर
कोकीळ गातो
गाणे मधुर

मोर नाचे
लाजे शर्वरी
गंध दरवळे
चहूकडे भूवरी

© कमलेश सोनकुसळे