मायचा आत्मा
मिटलेल्या डोळ्यांना पाहून
आत्मा मायचा जळाला होता
करुनी विस्फोट नराधमांनी
आकाचा नियम पाळला होता
मोकळा श्वास कसा घ्यावा
गर्भही मायचा जळाला होता
एकतेच्या बाता काय करता
पाठीराखा वैऱ्यास मिळाला होता
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२