आभास हा...
मृगजळा परी.. भेटीचा रंग न्यारा
मज वाटे आभास हा.. नजरेचा डाव सारा
तुला पाहताना.. अंगावर शहारा
मज वाटे आभास हा.. नजरेचा भाव सारा
हळुवार स्पर्श.. डोळ्यांचा तो इशारा
मज वाटे आभास हा.. नजरेचा खेळ सारा
वेड्या मनावर.. स्वप्नांचा हा पहारा
मज वाटे आभास हा.. नजरेचा भंग सारा
फुलापानांत तू.. सांगे हळूच वारा
मज वाटे आभास हा.. नजरेचा नाद सारा
तुझी आठवण.. आयुष्याचा पसारा
मज वाटे आभास हा. नजरेचा कटाक्ष सारा
कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372