गोडी गुलाबी
नकळत यावी जीवनी
लागावी तुझीच गोडी
गुलाबी स्वप्नात येऊनी
अलगद करावी खोडी
होऊन मदमस्त प्रिये
लागावी तुझीच गोडी
गुलाबी थंडीत येऊनी
साखरझोप ही तोडी
घेऊन या बाहुपाशात
लागावी तुझीच गोडी
गुलाबी आलिंगन देता
विचार जगाचा सोडी
जवळ ये ना तू माझ्या
लागावी तुझीच गोडी
गुलाबी स्पर्श करता
मनास मन हे जोडी
ये तू जीवनात अशी
लागावी तुझीच गोडी
गुलाबी बंध जोडुनी
शोभे आपुली जोडी
नाते असे हे आपुले
लागावी तुझीच गोडी
गुलाबी श्वास सागरात
तरावी आपुली होडी
गगनी विहार करण्या
लागावी तुझीच गोडी
गुलाबी भरारी घेण्या
तू जवळ असावी थोडी
का गेलीस तू सोडुनी
लागावी तुझीच गोडी
गुलाबी विरहात सखे
आठवणींचा खेळ मोडी
© कमलेश सोनकुसळे
मराठीचे शिलेदार समूह