♦️काव्यप्रकार: *प्रणू चाराक्षरी*
〰️〰️〰️〰️〰️
♦️नियम♦️
१)प्रत्येक ओळीत फक्त चार वर्ण/अक्षरे असावीत.
२) दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक असावा.
३) समयमक टाळावे.
४)" प्रणू चाराक्षरी" काव्यप्रकारात ,रचनेत स्वरयमकाचाच वापर आवश्यक!
५)१ ते १० कडव्यपर्येंत रचना करता येते.
उदाहरणार्थ:
विषय: 'साथ तुझी'
साथ तुझी
हवी मज
कसे सांगू
सख्या तुज-१-
रात्रंदिन
आठवणी
माझ्या मनी
साठवणी-२-
भेट तुझी
नित्य व्हावी
साथ तुझी
ही मीळावी-३-
अंतरीची
हाक माझ्या
येईल का
कानी तुझ्या-४-
तुज विण
जीणे व्यर्थ
जीवनाला
नाही अर्थ-५-
(सौ.सुधा जाधव)
*उपक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा* 💐
*सर्वांनी सहभाग घ्यावा*🙂🙏
सौ.सुधा जाधव
कोल्हापूर.
(संचालिका)
*शब्दवेड साहित्य समूह*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁