"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

नाते


वाळू सरकावी हातातूनी
निसटत गेले नाते तसे
आता खांदा तरी कुणाचा
आणि रडावे तरी कसे ?

वाळूवरती खोल रेघोट्या
नकळत ओढल्या गेल्या
ऐन भरतीच्या सुमारास
आपोआप पुसल्या गेल्या

गुंफावे तरी कितीदा
भविष्यातील मधुर स्वप्ने
ते वाऱ्यासंगे तुटत गेले
मनी उरले नुसते दुखणे

वादळ येऊन शमले
तसा मी ही निपचित
दाही दिशा शांत कश्या
कुणा कळावे हे गुपित ?

हृदयात निरव शांतता
उरला एकांत जीवनी
पुन्हा बांधावं एक घरटं
तुझ्यासाठी गं सजनी

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372