मधुमुक्त
आनंदकंद
गागाल गालगागा गागाल गालगागा
रात्रीस तारकांना शोधू नुरात तेव्हा
काळीज आठवांचे गेले पुरात तेव्हा
मैफिल तुझी कळाली निःशब्द काळजाला
मी पेश गझल केली साधी सुरात तेव्हा
एल्गार हाच केला उठली हळूच ज्वाला
स्वप्नात खेळ चाले त्यांच्या उरात तेव्हा
नाहीच जिंदगी ही कळली बरे कुणाला
उध्वस्त त्या क्षणाला केले धुरात तेव्हा
श्वासात हेलकावे माझ्याच सोबतीला
हृदयात दाटली ही मधुमुक्त रात तेव्हा