"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

तू तिथं मी



पाऊस मनातला 
बघतो जेव्हा मी,
मन होते ओलेचिंब 
धरणीला स्पर्शूनी.

होतो हर्षोल्लास
पाऊस बघातांनी,
भाव विश्वात रमतो
समोर असते 'ती'

स्मरतो कविता
'कविता'ला बघुनी,
मन मात्र हळुवार
साठवते आठवणी.

आठवुनी अतित क्षण
मन होते आनंदी,
नकळत आभास होतो
तू तिथं मी......

© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर