
कोरड्या नदीला पावसामुळे
जीवन जगण्याची संधी मिळाली
नदीचे वाहते पाणी पाहून
एकदम तिची आठवण झाली
जिवंत पाण्यामुळे किनाऱ्यांना
एकमेकांची साथ मिळाली
तिच्या विरहामध्ये तिथे
सांजवात अचानक बहरली
सांजवात बहरल्यावर हृदयी
आता जाणार होती सावली
सावली जातांना पाहून
अलगद तिची आठवण झाली
ती समोर नसून सुद्धा
मी तिची प्रतिमा पाहिली
शब्द मिळाले नाही तरी
शब्द मिळाले नाही तरी
मी त्यावर कविता केली
रजनी येतांना दिसताच
संध्या जाण्यास निघाली
संध्या जाताना पाहून
एकाएक तिची आठवण झाली
गेल्या काळामागे धावतांना
माझी खुपच धांदल उडाली
ती क्षणात नसून सुद्धा
शब्दरूपी स्वरांजली वाहिली
© कमलेश सोनकुसळे
काटोल. नागपूर
7588691372
kavya1029.blogspot.com