
तेच आहे आजही
कवितेचे शब्द हृदयात
कळले नाही मलाही
आठवणींच्या क्षितिजाशी
कठोर भेटीचे क्षण काही
टिपतो दुःख पापण्यांत
अवेळी बरसतो पाऊसही
फुंकर घालुनी कानाशी
वेडावून जाते मनही
अश्रू साठवितो डोळ्यांत
गाणे गातो वाराही
फुलं समजून जेव्हा मी
वेचू लागतो काटेही
चालत राहतो उजेडात
तुडवीत राहतो अंधारही
भाषा अबोल अधरांची
न कळावी तुलाही
हसत राहतो गालात
विरहाच्या धुक्यातही
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372
kamlesh1029@gmail.com
![]() |