"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

भीमराया तू ...

रात्रंदिन अथक परिश्रम
दिला घटनेला आकार,
संविधानात टाकला प्राण
भीमराया तू शिल्पकार

त्रिसुत्रीचा संदेश देऊन
शिक्षणाचा केला जागर,
शिक्षणमंत्र रुजला मनी
भीमराया तू ज्ञानसागर

समान हक्क मिळविण्या
केलेस शर्थीने प्रयत्न,
भारतीयांचा हृदयधनी
भीमराया तू भारतरत्न

अस्पृश्यता मिटवून जगी
कंटकातला मिटवला दानव,
सकलजनांच्या गर्दीमधला
भीमराया तू महामानव

बुद्धिमत्तेचा शिखर गाठला
भारताचे नव-आभूषण,
कर्तृत्वाने वाढली कीर्ती
भीमराया तू विश्वभूषण

शिकून सवरून बघा
बहुजन झाला ज्ञानवंत,
शिक्षित झाला समाज
भीमराया तू प्रज्ञावंत

चवदारचे पाणी अस्पृश्यांना
केले ऐतिहासिक कार्य,
अंधकारमय जीवनी झाला
भीमराया तू क्रांतीसूर्य

मनुवादी विचारावरती
योजिले समानतेचे तत्व,
उच्च विचार अंतःकरनी
भीमराया तू बोधीसत्व 

© कमलेश तुकारामजी सोनकुसळे
काटोल, नागपूर 5788691372