माऊलीला साकडे घालण्या
भक्तांचा महापूर आला
मुखी नाम माऊलीचे
उधाण या भक्तीला
करी सकलांची
मनोकामना
पंढरीचा
विठ्ठल
राजा
हा
अवघ्या पंढरीत भक्ति ही
असे आषाढी एकादशी
तिन्हीसांज जरी भक्ती
'बाप' माझा उपाशी
मागणे एकचि
ठेव आनंदी
बा विठ्ठला
बापाशी
दूर
मी
© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372