वेड
पाऊस येता मन.. भिजलं पावसाने
तिच्या आठवणीत.. छळलं पावसाने
शिरता हळुवार.. हृदयात तिच्या
मनाचं पान मग.. वाचलं पावसाने
उगाच भिजवलं.. अंग अंग तिचे
मनातलं गुपित.. जाणलं पावसाने
गालावरचे थेंब.. हळूच टिपताना
कोड्यात अलगद.. टाकलं पावसाने
आतुरली तीही.. मिठीत येण्या
बाहुपाशात तिला.. घेतलं पावसाने
श्वास गुलाबी.. गहिवरला आता
तिचंच वेड मज.. लावलं पावसाने
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372