🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*शब्दवेड साहित्य समूह* २✍️
*कार्यशाळा*
आज आपण नविन काव्यप्रकार शिकणार आहोत. काव्यप्रकाराचे नाव आहे "षटकोळी"
सौ.संध्याराणी कोल्हे यांनी षटकोळीची निर्मिती केली आहे..त्यांचे आभार मानुन..त्यांनी दिलेले नियम वापरून षटकोळी" रचना जास्तीत जास्त करूया..
नियम:
१)षट्कोळी रचना सहा ओळींची असते.
२)प्रत्येक ओळीत तीन शब्द असतात.
३)पहिल्या तीन ओळीचा अर्थ शेवटच्या तीन ओळींशी सुसंगत असावा.
४)तिसऱ्या व सहाव्या ओळीत यमक साधावा.
५)तिसरी व सहावी ओळी लयीत असावी.त्या दोन्ही ओळीचा अर्थ जुळणे आवश्यक.
उदा.
*नवनिर्माण*
गुढी उभारून आपण
प्रण घेऊन नवनिर्माणाचा
*सुरवात आनंदाची करूया*
*संकटाला न डगमगता
*हिंमतीने लढा देत
**भविष्य उज्वल घडवूया*
*संध्याराणी कोल्हे*
* (षटकोळी निर्माती)
*सुरवात आनंदाची करूया*
**भविष्य उज्वल घडवूया*
अर्थ जुळला की षट्कोळी रचना तयार होते.
६)तिसरी व सहावी ओळ सारखी नसावी.
७)षट्कोळी आशययुक्त असावी.
८)सहा ओळी लयीत असाव्यात.
९) यमक हा दोन वेगळ्या शब्दांचा असावा.(गझलेतील काफिया ,रदीफ स्वरुपात नसावा)
१०) यमक तिसऱ्या व सहाव्या ओळीतच साधावा.त्याव्यतिरिक्त कुठे यमक साधू नये.
११)पहिल्या तीन ओळीचा शेवटच्या तीन ओळींशी सुसंगत असावा.
१२)षटकोळी रचनेत शब्दांची पुनरावृत्ती करु नये.
(एकच शब्द दोनपेक्षा जास्त वेळा घेऊ नये.)
( *संग्रहित* )
(२०/१०/२०२० मध्ये हा काव्यप्रकार एकदा शिकविल्या होता)
उपक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा 💐🙂
सौ.सुधा जाधव
कोल्हापूर.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿