"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

वेदना

वेदना

पावसाने बरसुन नियम पाळले होते
वादळाने मग सुखाचे क्षण जाळले होते

ती चर्चा होती सर्वत्र ओठांवरी या जगाच्या
विस्मयाने तिने माझेच नाव गाळले होते

तो गंध घेण्यास झिजवले ताटवे त्यानेही
फुलपाखरू का तिच्यावरच भाळले होते

केलाच नाही बघा अति श्रुंगार कधी तिने
केसात मोगऱ्याला अलगद माळले होते

न काढला शब्दही दुःखाच्या सागरात तिने
चुरगाळण्याआधी पाने सारे चाळले होते

त्या वेदना अशा झिरपू लागल्या डोळ्यातूनी
रे मैफिलीत तुझ्या मलाच का टाळले होते

© कमलेश सोनकुसळे, काटोल