(कार्यशाळा)
♦️दिनांक : १४/६/२०२१
♦️काव्यप्रकार: *हायकू*
"हायकू" हा तीन ओळींचा जपानी काव्यप्रकार आहे. 'छोटे काव्य व मोठा आशय! शेवटच्या ओळीत कलाटणी वा जीवनाचा अर्थ सांगीतला असतो.
थोडक्यात.. हायकू' म्हणजे तीन ओळीत लिहीलेले..कमीतकमी शब्दांत..कोणताही विषय स्विकारणारे.. पहिल्या व तीसऱ्या किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत यमक साधणारे..मुळ उद्गाराला अकस्मात कलाटणी देणारे छंदमुक्त पण तालबद्ध काव्य!
हायकू" मध्ये ५-७-५ हा आकृतीबंध असतो. (एकूण १७ वर्ण) असणारे काव्य!(५ किंवा ७ कडव्यांपर्यंत रचना केली जाते)
(अंत्यपूर्व स्वरयमक साधावे..समयमक टाळावे)
हायकू" म्हणजे कविता नाही. हायकू हा जीवंत घटनेचा ...जीवंत उद्गार असतो. तो क्षण असतो.. कल्पना,उपदेश त्यात नसतो.
हायकू" निसर्गात घडलेल्या घटनांवर लिहीला जात होता.. अलिकडे आपल्या अवतीभवती घडलेल्या घटना, प्रसंगावर सुद्धा लिहीला जात आहे. विषयाचे बंधन नाही.
हायकू".. .हा जीवंत घटनेचा जीवंत उद्गार असतो.. हायकू वाचताक्षणी तो तो प्रसंग/घटना नजरेसमोर यायला हवी. हायकू वाचताना वाचकांच्या दृष्टीसमोर तो प्रसंग जसाच्या तसा यावा. प्रसंग काल्पनिक असला तरी वास्तव वाटावा. इतका बेमालुम रचना करावी. हायकु" नेहमीच वर्तमान काळाचा म्हणजे सद्य परिस्थितीत असतो.
घटना व क्षणांचे केवळ वर्णन नको. आपले काहीतरी सुचीत करणे व वाचकाला त्याचे कांहीतरी समजणे असावे. त्यात गर्भित अर्थ असावा.
जपानी प्रकारानुसार हायकूचा विषय.. निसर्गच होता. अलिकडे मनात बिंबलेल्या कोणत्याही विषयावर हायकू लिहीला जातो. मात्र नैसर्गिक क्षणांचा मानवी जीवनमुल्यात उपयोग प्रभावी ठरतो.
प्रतिकाच्या योजनेने हायकू प्रभावी होतो. उपमा,सर्वनामे, विशेषणे, तुलना करणे टाळावे. परंतु व्यंजना,लक्षणा,व संकेत यांचा उपयोग जरूर करावा.
♦️ *नियम* :✍️
*आकृतीबंध* : (५-७-५)
🔸पहिल्या ओळीत... *५ वर्ण/अक्षरे*
🔸दुसऱ्या ओळीत.... *७ वर्ण*
🔸तिसऱ्या ओळीत.... *५वर्ण*
*यमक जोडणी* : *पहिल्या आणि तीसऱ्या ओळीत यमक* साधायचे किंवा *दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओळीत यमक* साधायचे..( एका कवितेसाठी दोन्ही पैकी कोणत्याही एकच यमकाचा नियम वापरून हायकू करावा.)
विषय: निसर्ग किंवा भोवतालचे वातावरण.एखादी घडलेली घटना किंवा निसर्ग किंवा वातावरणात झालेला बदल..विषयाला बंधन नाही..
(१३/१०/२०२० मध्ये पहीली कार्यशाळा झाली आहे.)
सर्वांना नव्या काव्यप्रकारासाठी.. शुभेच्छा 💐 🙏
उदा.
हायकू..
(भक्ती गीत..)
ईश्वरा तुझे
मानावे उपकार
तुच आधार-१-
विसरू कशी
मजवरची प्रिती
अगाध किती-२-
स्विकार करी
पापी या पामराचा
मज दीनाचा-३
पुरीव शक्ती
तव कार्य करण्या
सिध्द रहाण्या-४-
सर्वांना आता
आशिर्वादाने भर
स्विकार कर
सौ.सुधा जाधव
कोल्हापूर.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁