"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

हायकू तंत्र

🌈हायकू लिहितांना...

रचना ५-७-५ 
एकूण सतरा अक्षरे असावीत

पहिली व दुसरी ओळ
किंवा 
दुसरी व तिसरी ओळ सलग असावी.
 5+12 किंवा 12+5
असा आकृतीबंध असावा...

तिन्ही ओळी मिळून एक वाक्य नको.
तसेच तिन वेगवेगळे वाक्य नको


🌈हायकू लिहितांना...

रचना
५-७-५ अशीच असावी

यमक असावा.. वाचनीय होतो

एखादे वेळी...

(यमक असले किंवा नसले तरी चालेल.. त्याबद्दल अट्टाहास नसावा
पण आशय महत्वाचा)

पुनरावृत्ती व अनावश्यक शब्द टाळावेत. 

उदा. काळोखी रात्र
(फक्त रात्र असा वापर करावा कारण ती काळोखी असतेच)


🌈हायकू लिहितांना...

हायकू क्षण असावा, 
हायकू कल्पना नको ,
हायकूत उपदेशही नको.
प्रतिकाच्या/उपदेशाच्या बंधनाने हायकू प्रभावी होतो.


🌈हायकू लिहितांना...

क्षण किंवा घटनेचे केवळ वर्णन नको 
हायकुतील अर्थ गर्भीत असावा.
हायकुतून काहीतरी सूचीत करणे आवश्यक असते.  हायकूकाराने काही आशय वाचकांसाठी राखून ठेवायला हवा.
हायकू वाचून वाचक प्रवृत्त होणे आवश्यक.
कल्पना, वर्णन किंवा उपदेश टाळावे


🌈हायकू लिहितांना .... 

प्रभावी हायकू रचना साठी सर्वनामे, विशेषणे, उपमा, कथन, तुलना करणे इत्यादी टाळावेत.
परंतू 
व्यंजना, लक्षणा व संकेत यांचा उपयोग प्रभावीपणे करावा.
हायकू मध्ये कमी शब्दांचा वापर होत असल्यामुळे (17 अक्षरे) त्यातील भाव व सौंदर्य जपून ठेवावे, जेणेकरून आशयघन हायकू निर्माण होईल.


🌈हायकू लिहितांना...

निसर्गातून तयार झालेला हायकू उत्तम; हायकूचा विषय निसर्गच असला पाहिजे असेही नाही. कोणत्याही विषयावर हायकू लिहता येतो. महत्वाचे म्हणजे नैसर्गिक क्षणांचा हायकू प्रभावी ठरतो.
काल्पनिक शब्दांचा उहापोह नसावा. उदा. नदी बोलली, चंद्र डोकावतो, फुल हसले इत्यादी 
वरील👆 उदाहरणात काल्पनिकता आहे. 
हायकुत कल्पनिकतेला वाव नाहीच.
 

🌈 हायकू प्रकार म्हणजे वास्तविकता
🌈हायकुत क्षण महत्वाचा
🌈पहिल्या क्षणाला कलाटणी देऊन दुसऱ्या क्षणावर बिंबविणे महत्वाचे

🌹हायकू लेखनासाठी शुभेच्छा🌹


*कमलेश सोनकुसळे*
मराठीचे शिलेदार समूह