कधी वाटतंय मला
कधी वाटतंय मला
व्हावं तुझं क्षतज
हृदयातूनी सळसळताना
भान नसावे मज
कधी वाटतंय मला
व्हावा तुझा श्वास
शरीरातुनी धावताना
तुझाच व्हावा भास
कधी वाटतंय मला
डोळ्यातील अश्रू व्हावं
अलगद गालावरून
हळुवार ओथंबावं
कधी वाटतंय मला
तुझं कुंकू व्हावं
माथ्यावरती तुझ्या
मलाही चकाकता यावं
कधी वाटतंय मला
सुगंधित गजरा व्हावा
केसांभोवती मग
हळुवार तू माळावा
कधी वाटतंय मला
व्हावी तुझी पैंजण
छन छन आवाजांनी
पिंजून काढावं अंगण
कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२