दीनदुबळांचा आदिसूर्य
भारतरत्न तू महामानव,
भारतरत्न तू महामानव,
नतमस्तक होतो तुझ्यापुढे
भारतीयांचा तू अभिमान.
अस्पृश्यता मिटविण्या जगती
वाहिले तू आपुले जीवन,
वाहिले तू आपुले जीवन,
दिला संदेश लहान थोरांना
जाती धर्म एकसमान.
भीमराया सांगतो तुला आता
नाही शंका नाही समाधान,
नाही शंका नाही समाधान,
लोकशाहीच्या या देशात
रचली जाते गरिबांची सरण.
देशासाठी त्यागीले प्राण
घटनेचा शिल्पकार होऊन,
घटनेचा शिल्पकार होऊन,
आरक्षणाची वाताहत पाहून
उठला असता तूच पेटून.
सकल जणांना मिळावे ज्ञान
ज्ञानगंगेत कोण थोर, कोण लहान ?
ज्ञानगंगेत कोण थोर, कोण लहान ?
चंद्र-तारे गगनी जोवर
भीमराव व्हावे तुझेच स्मरण.
© कमलेश तुकारामजी सोनकुसळे
काटोल, नागपूर
काटोल, नागपूर
7588691372