
सदा तूच
म्हणत होती,
वसुंधरा आहे
ही प्रीतीची,
अपार कष्ट
सकंटे तुडविण्यास,
तयारी आहे
माझ्या मनाची,
अंतरी खात्री
आहे मला,
आहे मला,
तुझ्या विवेकी
आत्म-विश्वासाची,
संकटे फार
असले तरी,
झालर आहे
त्यास आशेची,
विलीन झाले
जीवन माझे,
जीवन माझे,
तुझ्या नाटकीय
प्रेम संवादात,
शोधितो मी
माझे अस्तित्व,
तुझ्या आठवणींच्या
रुपेरी पदरात.
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372