"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

श्रावणसरी (चारोळ्या)

श्रावणसरी

थाटण्या नवा संसार
लेक चालली सासरी,
निरोप देता माहेरला
बरसल्या श्रावणसरी.

© कमलेश सोनकुसळे
मराठीचे शिलेदार समूह



श्रावणसरी

वेडावून गेले मन माझे
भेटाया गं तुला सजनी
बरसल्या श्रावणसरी
हळुवार मग डोळ्यांतूनी

© कमलेश सोनकुसळे
मराठीचे शिलेदार समूह



श्रावणसरी

भेगाळलेल्या भूवरी
श्रावणसरींची नक्षी
मातीचा गंध घेऊनी
'पेरते व्हा' गातो पक्षी

© कमलेश सोनकुसळे
मराठीचे शिलेदार समूह



श्रावणसरी

हृदयावर घाव करुनी
अंतरीचे श्वास दाटले
श्रावणात या सरींसवे
अश्रूही डोळ्यात साठले

© कमलेश सोनकुसळे
मराठीचे शिलेदार समूह



श्रावणसरी

मयूर नाचे थुई थुई
बरसता श्रावणसरी
वेडावून गेली राधा
ऐकून कान्हाची बासरी

© कमलेश सोनकुसळे
मराठीचे शिलेदार समूह