"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

कोरोनाला हरवायचं आहे

कोरोनाला हरवायचं आहे

कोरोनाला हरवायला, उभा सारा गाव आहे
व्हायरसला कंठस्नान, जनता कर्फ्युचं नाव आहे

पार्टीमध्ये सरळ शिरून, कणिका बेताल झाली
निघाली टेस्ट पॉझिटिव्ह, मनी त्याचा घाव आहे

केला मनाशी पक्का इरादा, दोन हात करण्या
शहर अन् गावही तयार, मागे उभा राव आहे

हा विषाणू पसरे स्पर्शातूनी, मास्क घालू सदा
हस्तांदोलन कशाला, नमस्काराला भाव आहे

खबरदारीने कोरोनाला, पळविण्या सज्ज जनता
जिंकणार तर खात्रीने, उरला फक्त अर्धा डाव आहे

एकजूट होऊन करूया कोरोनाला पूर्ण परास्त
करा घंटानाद भूवरी, टाळ्यांनाही इथे वाव आहे

© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२